ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात भाजपमधील मोहिते पाटील गटाला “खिंडार”

भाजपमध्ये मोहिते पाटील गटाचा राजकीय बुरुज ढासळत असताना क्रांतीदिनी बुरुजातील एक चिरा निसटला…

अकलूज (बारामती झटका)

महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोठे स्थान निर्माण केले होते. राजकीय वलय निर्माण केलेले होते. दिवसेंदिवस राजकीय वलयाची ताकत कमी होती चाललेली होती. राजकारणात गळचेपी होत असल्याने शिवरत्नवरील मोहिते पाटील परिवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. भाजपमध्ये सुद्धा मोहिते पाटील गटाचा राजकीय बुरुज ढासळत असताना ९ ऑगस्ट क्रांतीदिनी राजकीय बुरूजातील एक चिरा निसटला, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात महाळुंग नंतर बोरगाव गावच्या राजकारणावर अनेक गावे अवलंबून असतात. बोरगावचे पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजकारण व समाजकारणमध्ये दबदबा निर्माण केलेला आहे. पूर्वीच्या काळी लोकल बोर्ड होते, त्यावेळेस रावसाहेब पाटील लोकल बोर्डाचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष होते. तेव्हापासून बोरगावकर पाटील कायम राजकारणाच्या प्रवाहात राहिलेले आहेत. पक्ष कोणताही असो बोरगावकर पाटील असल्याशिवाय राजकीय कोरम पूर्ण होत नाही.

मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपले समर्थक यांना पक्षीय संघटनेत घेतलेले आहे. त्यामध्ये रावसाहेब पाटील यांचे नातू माळेवाडी बोरगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच रवींद्र पाटील यांच्याकडे भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी भाजपचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलेली होती. विशेष म्हणजे ९ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांतीदिनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडेच राजीनामा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिलेला असल्याने माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात मोहिते पाटील गटाला खिंडार पडले असल्याची माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे.

धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा निवडणुकीत उभा राहण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांची जमवाजमा सुरू आहे. मोहिते पाटील गटाचा राजकीय बुरुज ढासळला असल्याची चर्चा सुरू असताना क्रांतीदिनी बुरुजातील एक चिरा निसटला असल्याने अजून किती पडझड होणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
रवींद्र पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन केंद्रीय माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या दिल्ली येथील जनपथ येथे जाऊन भेट घेतलेली आहे. त्यामुळे रवींद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.

रवींद्र पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला असला तरी मोहिते पाटील गटाला काही फरक पडणार नाही, असे मोहिते पाटील समर्थक यांच्यामधून बोलले जात आहे. तर रवींद्र पाटील यांच्या समर्थकांमधून बोलले जात आहे की, राजकीय ताकद असल्याशिवाय सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष पद दिलेच नसते ? अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकारणाची दिशा कशी असणार याकडे राजकीय विश्लेषक व जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort