माळशिरस तालुक्यातील अधिकारी भूमिपुत्र यांचा आदर्श घ्यावा असा आदर्शवत उपक्रम…
माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्राच्या अकलूज येथील दुसऱ्या शाखेचे उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील अधिकारी भूमिपुत्र यांनी, या समाजात आपण जन्मलो आहोत, समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त हेतूने माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्राचे माळशिरस येथे दि. ०९/०४/२०२२ पासून सुरू केलेले आहे. सदरच्या ज्ञानसेतूला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान यांनी ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्राची दुसरी शाखा अकलूज येथे जगदाळे फर्निचर, तिसरा मजला अकलूज पोलीस स्टेशनच्या शेजारी सुजयनगर – ४, अकलूज, जि. सोलापूर येथील शाखेचा पालघरचे पोलीस अधीक्षक मा. बाळासाहेब वाघमोडे पाटील यांच्या शुभ हस्ते रविवार दि. ११/०६/२०२३ रोजी सायंकाळी ०५-०० वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे.

यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. महादेव घुले, सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. भारत शेंडगे, मंत्रालयातील अवर सचिव मा. विनायक लवटे, जीएसटी मुंबई उपायुक्त मा. विकास काळे, मंगळवेढा प्रांताधिकारी मा. आप्पासाहेब समिंदर, कोल्हापूर प्रांताधिकारी मा. बाबासाहेब वाघमोडे पाटील, उपजिल्हाधिकारी, पुणे, मा. हरेश सूळ, वित्त व लेखा विभाग नवी मुंबईचे सहाय्यक संचालक मा. महादेव टेळे, सातारा विभागीय वन अधिकारी मा. हरिश्चंद्र वाघमोडे पाटील, नाशिक जिल्हा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक मा. फैयाज मुलाणी, अकलूज पोलीस उपविभागीय अधिकारी मा. बसवराज शिवपूजे, माळशिरसचे तहसीलदार मा. अमरदीप वाकडे, माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. विनायक गुळवे, अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मा. दयानंद गोरे, अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. दिपरतन गायकवाड यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन स्पॉटलाईट अकॅडमी पुणेचे संचालक डॉ. सुशील बारी व द लायन अकॅडमी पुण्याचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार मा. उत्तम पवार यांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी उद्घाटन समारंभ व नूतन अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

सदरचा कार्यक्रम माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक मुंबई विभागाचे राज्य गुप्त वार्ता पोलीस उपायुक्त मा. विश्वास पांढरे, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय सचिव मा. सदाशिव साळुंखे, गुजरात राज्यातील आरवली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. संजय खरात, ओडिसा राज्यातील देवगडचे उपवनसंरक्षक मा. धनंजय मगर, आयपीएस अधिकारी मा. शुभम जाधव, आयएएस अधिकारी मा. सागर मिसाळ, नाशिक जिल्हा न्यायाधीश मा. उमेशचंद्र मोरे, भारतीय रेल्वे विभाग वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, भारतीय राजदूत मा. जयपाल देठे, पुणे विभाग भूमी अभिलेख उपसंचालक मा. अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng