Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज – तहसीलदार जगदीश निंबाळकर.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील ३४ गावाच्या मतमोजणीच्या ११ फेऱ्या होतील, १२ टेबलवर मतमोजणी सुरू राहणार आहे.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीचे शांततेत व निर्भयपणे मतदान पार पडलेले आहे. उद्या दि. २०/१२/२०२२ रोजी सकाळी ९ वा. बरोबर वेळेवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्या ११ होणार आहेत मतमोजणीचे १२ टेबलवरती मतमोजणीची प्रक्रिया अखंडपणे सुरू राहणार असल्याचे माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी माहिती दिली. यावेळी निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार अशिष सानप उपस्थित होते.

माळशिरस येथील म्हसवड रोड येथे शासकीय धान्य गोडाऊन येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे. पहिली फेरी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे‌. पहिल्या फेरीत पुरंदावडे, चौंडेश्वरवाडी, चांदापुरी, दुसऱ्या फेरीत इस्लामपूर, गुरसाळे, तरंगफळ, तिसऱ्या फेरीत तिरवंडी, जांभूड, मोटेवाडी, माळशिरस, चौथ्या फेरीत पठाणवस्ती, कोळेगाव, पानीव पाचव्या फेरीत आनंदनगर, मेडद, संगम सहाव्या फेरीत बागेचीवाडी, तामशीदवाडी, मारकडवाडी, सातव्या फेरीत सदाशिवनगर, पिसेवाडी, उघडेवाडी, लोंढे मोहितेवाडी, आठव्या फेरीत काळमवाडी, धानोरे, कचरेवाडी, उंबरे दहिगाव, नवव्या फेरीत फळवणी, पळसमंडळ, माळेवाडी बोरगाव, तांबेवाडी दहाव्या फेरीत खंडाळी, निमगाव, अकराव्या फेरीत यशवंतनगर, वेळापूर अशा गावांची मतमोजणी होणार आहे.

सर्व उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी यांनी मोबाईल घेऊन येऊ नये. सोबत येताना ओळखपत्र घेऊन यावे. सकाळी बरोबर ९ वा. मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अखंडपणे मतमोजणी सुरू राहील. त्यासाठी वेळेवर उमेदवार व प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी सांगितले आहे.

बारामती झटका यूट्यूब चॅनल मतमोजणी गोडाऊन शेजारी पत्रकार कक्ष उभारण्यात आलेला आहे‌. पत्रकार कक्षातून बारामती झटका ग्रामपंचायत निवडणुकीचे लाईव्ह अपडेट देणार आहेत. तरी सर्व प्रेक्षकांनी आजच बारामती झटका सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा. आपण कोठेही असाल तरी आपणाला ३४ ग्रामपंचायतीच्या निकालाची माहिती मिळणार आहे.

बारामती झटका यूट्यूब चॅनलचे प्रेक्षकांनी बातम्या पाहिलेल्या वीस लाख मिनिटे कालावधी झालेला आहे. दिवसेंदिवस बारामती झटका यूट्यूब चॅनल प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. तर बारामती झटका वेब पोर्टल वाचकांच्या पसंतीला उतरलेले असून पावणेदोन कोटी वाचक झालेले आहेत. सर्व प्रेक्षक आणि वाचकांचे बारामती झटका परिवार यांचेकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. आपण केलेल्या सहकार्याबद्दल संपादक श्रीनिवास कदम पाटील आपले ऋणी आहेत‌. आपल्या भागातील प्रलंबित प्रश्न व बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याकरता आपण सदैव सतर्क रहावे. श्रीनिवास कदम पाटील संपादक बारामती झटका मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व 91 30 10 32 14 या नंबर वर संपर्क साधावा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort