माळशिरस तालुक्यातील डाळिंब बागायतदार यांनी कृषी क्षेत्रात मानाचा तुरा रोवलेला आहे
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने विकसित केलेली पद्धत वापरून तेलकट रोगावर नियंत्रण करून भरघोस उत्पन्नाबद्दल तानाजी नावडकर, विजय नरूटे, बिरा वाघमोडे यांनी पुरस्कार मिळवले
माळशिरस ( बारामती झटका )
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांच्यावतीने महाराष्ट्रातील प्रगतशील डाळिंब शेतकरी यांनी उच्च प्रतीच्या डाळिंब उत्पादनासाठी व मागील वर्षी केंद्राने विकसित केलेल्या तेलकट रोगाच्या सोप्या सहा पद्धती स्टेम सोलरायझेशनचे प्रात्यक्षिक बागेमध्ये यशस्वीरित्या राबविणाऱ्या महाराष्ट्रातील प्रगतशील डाळिंब शेतकऱ्यांचा सन्मान पुणे विज्ञान संशोधन केंद्र संचालनालय संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांच्या विशेष उपस्थितीत दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त प्रगतशील डाळिंब बागायतदार यांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील तानाजी विष्णू नावडकर, फोंडशिरस येथील विजय विश्वनाथ नरूटे, तामशीदवाडी येथील बिरा बंडू वाघमोडे यांनी नाविन्यपूर्ण उत्पादन घेऊन पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. माळशिरस तालुक्यातील डाळिंब बागायतदार यांनी कृषी क्षेत्रात मानाचा तुरा रोवलेला आहे.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचा अठरावा वर्धापन दिन व महाराष्ट्रातील प्रगतशील डाळिंब शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी आयोजित केलेला होता. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत डॉ. के. व्ही. प्रसाद पुणे विज्ञान संशोधन संचनालय, श्री. दीपक शिंदे प्रकल्प संचालक पुणे, श्री. प्रभाकर चांदणे अध्यक्ष भाऊसाहेब काटे उपाध्यक्ष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, शहाजी जाचक पुणे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.
माळशिरस तालुक्यातील तानाजी विष्णू नावडकर, विजय विश्वनाथ नरूटे, बिरा बंडू वाघमोडे यांना सन्मानित करताना श्री. रणजीत पवार, दत्तात्रय जाधव, अमरजीत जाधव, सचिन सिद, बापू माने, डॉ. कृष्णा मोटे, प्रदीप नलवडे, दादासाहेब गोरे, महेश नावडकर, बाळासाहेब नरूटे, सचिन नरूटे, जितेंद्र कदम, सर्जेराव सरक, विजय वाघमोडे, धनाजी सूळ, दादासो जाधव, लक्ष्मण वाघमोडे, अविनाश दडस, अशोक बोराटे, आबा बोराटे, मोतीराम शेंडे, इंद्रजीत बनकर, राजू जाधव, नंदू जाधव, विजय महादेव, नरूटे श्याम, जगताप सुहास, पवार राजू, जरग निलेश, ढोपे ब्रह्मदेव, दुधाळ सर शेळगाव आदी मान्यवर उपस्थित होते.
सदाशिवनगर येथील रणजीत कृषी केंद्राचे मालक भागवत अण्णा पवार उर्फ भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी नावडकर, विजय नरूटे, बिरा वाघमोडे यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने विकसित केलेल्या पद्धतीचा अवलंब करून तेलकट रोगावर नियंत्रण करून भरघोस उत्पन्न घेतलेले आहे.

भगवा जातीची हजार रोपे तेरा बाय दहा या अंतरावर साडेतीन एकरामध्ये डाळिंब पीक घेतलेले होते. फवारणी, कंपोस्ट खत, जैविक व रासायनिक खताचा वापर केलेला होता. सर्वसाधारण एकरी दोन लाख रुपये खर्च केलेला होता. तीन एकरामध्ये सहा लाख रुपये खर्च करून वीस लाखाचे डाळिंब पिकाचे उत्पादन घेतलेले होते. डाळिंब पिकाचा पहिलाच भार होता. युरोप देशांमध्ये एक्सपोर्ट डाळिंब केलेले होते. अशा डाळिंब प्रगतशील बागायतदार यांचा एकीकडे सन्मान झाला तर दुसरीकडे डाळिंब शेतकरी नियोजन व विकसित केलेल्या पद्धतीने वापर न केल्याने तेलकट रोगामुळे अनेकांनी बागा काढून टाकलेल्या आहेत.
माळशिरस तालुक्यातील तानाजी नावडकर, विजय नरूटे आणि बिरा वाघमोडे यांनी भागवतभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या समोर नवा आदर्श निर्माण करून डाळिंब क्षेत्रामध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे. या त्रिमूर्तींचे अभिनंदन माळशिरस तालुक्यातून होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng