माळशिरस तालुक्यातील पहिल्या कृषि विभाग अनुदानीत डाळ मिलचा शुभारंभ…
लवंग (बारामती झटका)
ॲग्री महाडीबीटी अंतर्गत राष्ट्रीय कृषि विकास योजना अनुदानीत लवंग येथील माजी सरपंच श्री. भास्कर लक्ष्मण भोसले यांची डाळ मिल व संलग्न यंत्रसामुग्रीचे निवड झाल्यानंतर अनुदान आदागीच्या सर्व बाबीची पूर्तता व मिल कार्यान्वीत झाल्यानंतर त्यांना १.५० लाख मंजूर झाले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा अभियानाचे औचित्य साधून श्री. भास्कर भोसले यांचे भोसले उद्योग समुहाच्या प्रणाली डाळ मिलचा शुभारंभ व उदघाटन श्री. सतिश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी माळशिरस यांचे शुभहस्ते झाले.
यावेळी त्यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग संधी वाव अनुदान व योजनेची महिती उपस्थित बहुसंख्य शेतकरी बांधवांना दिली. यावेळी विनोद भोसले यांनी डाळ मिलचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यक्रमात मंडळ कृषि अधिकारी अकलुजचे श्री. दत्तात्रय गायकवाड यांनी निर्यातक्षम केळी उत्पादन व निर्यातसाठी नोंदणीबाबत माहिती दिली. तसेच महाळुंग येथील कृषि भुषण कुबेर महादेव रेडे यांनी शेती बरोबर कृषि पुरक व जोडधंदा करण्याचे आवाहन केले. श्री विशाल केचे यांना छोट्या छोट्या कृषिपुरक व कृषि जोडधंदासाठी बँकांनी सहकार्य करावे व त्यांना अनुदान मिळणेबाबत सुचना मांडली.

या कार्यक्रमात डाळ मिल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. लवंग गावचे पोलिस पाटील श्री. विक्रम भोसले यांचेहस्ते राष्ट्रध्वज संहीता पालन करून मानवंदना व राष्ट्रगीत सह झेंडा उतरविण्यात आला. लवंग ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. धनंजय चव्हाण यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी महाडीबीटीमध्ये प्रोफाईल तयार करण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब सरवदे यांनी केले. या कार्यक्रमास श्री. लालासाहेब पराडे ग्रा.पं. सदस्य, प्रगतशील शेतकरी, पदाधीकारी व नागरिक उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन नियोजन प्रणाली डाळ मिलचे प्रवर्तक श्री. विनोद भोसले यांनी केले होते. चहा व अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
