Uncategorized

माळशिरस तालुक्यात प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ. श्रीमती सुनिता सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार..

सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या मनरेगा यशोगाथा संवाद कार्यक्रम व राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे प्रधानमंत्री वनसंरक्षक डॉक्टर श्रीमती सुनिता सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रगतशील बागायतदार मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या मनरेगा यशोगाथा संवाद कार्यक्रम व राज्यस्तरीय कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन चांदापुरी, ता. माळशिरस येथील वाइल्ड लाईफ नॅचरल ऍग्री एक्वा फॉरेस्ट फार्म चांदापुरी एक येथे दि. २६/५/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रम संपन्न होणार आहे. सदरच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रगतशील शेतकरी तथा जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजमल भागवत, अरविंद देशमुख प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी तथा संचालक जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ जळगाव, अर्जुनसिंह मोहिते पाटील आंतरराष्ट्रीय द्राक्ष वाईन उत्पादक बागायतदार तथा माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती, सोलापूर विभागीय सामाजिक वनीकरण अधिकारी श्री. हरिश्चंद्र वाघमोडे, जळगाव विभागीय सामाजिक वनीकरण अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे, बुलढाणा विभागीय सामाजिक वनीकरण अधिकारी श्री अक्षय गजभिये आदी उपस्थित राहणार आहेत.

सदरच्या कार्यक्रमात शेवगा, नारळ, बिबा, अर्जुन, सुबाभूळ इत्यादी वृक्ष लागवडीतून एकरी दहा लाख रु. वार्षिक मनरेगा योजनेतून शंभर टक्के निधीमधून यशस्वी झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांचा संवाद कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा व ऐकण्याचा राज्यातील पहिला कार्यक्रम आहे. देशी शेळी, मेंढी, कोंबडी, शेवगा, नारळ लागवड यांची मिश्र शेती मनरेगा व इतर शासकीय योजनेमधून शंभर टक्के निधी उपलब्ध असून या योजनेला कोणत्याही प्रकारचा स्वनिधी किंवा कर्ज उभा करण्याची आवश्यकता नाही. श्री. नंदकुमार साहेब अप्पर मुख्य सचिव रोहयो व इतर मागासवर्ग मंत्रालय, मुंबई यांच्या दूरदृष्टीमधून लखपती कुटुंब योजना व संपन्न कुटुंब कल्याण कार्यक्रम संपन्न होत आहे.

आयुर्वेदिक बिबा लागवड शेती तसेच शेतकरी प्रक्रिया युनिट कार्यक्रम प्रात्यक्षिक पाहण्याची व्यवस्था केलेली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यास एकरी पंधरा लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो, हे आपणास प्रत्यक्ष पाहावयास मिळेल. तरी मनरेगा लाभार्थी यशोगाथाचा संवाद कार्यक्रमात राज्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शेती उद्योजक अरुण काळे, शेती उद्योजक सदानंद काळे, सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण सोलापूर राजू आटोळे यांनी केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button