Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस नगरपंचायत विकासाचं आदर्श मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्नशील – नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख

माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे लोकप्रिय दमदार आ. राम सातपुते यांच्या सहकार्याने विकासकामांची घौडदौड सुरू…

माळशिरस नगरपंचायत हद्दीत सात कोटी रुपयाच्या विकासकामांचा लवकरच शुभारंभ होणार.

माळशिरस ( बारामती झटका )

माढा लोकसभेचे कार्यतत्पर खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे विकासप्रिय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या सहकार्याने महाराष्ट्रामध्ये माळशिरस नगरपंचायत विकासाचं आदर्श मॉडेल बनविण्याचा संकल्प आहे. सात कोटी रुपयाच्या विकासकामांचा नगरपंचायतीच्या हद्दीत लवकरच मोठ्या थाटामाटात उद्घाटन समारंभ घेणार असल्याचे माळशिरस नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष तथा सभापती स्थायी समितीचे डॉक्टर अप्पासाहेब एकनाथ देशमुख यांनी बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना माहिती देताना सांगितले.

यावेळी उपनगराध्यक्ष तथा सभापती बांधकाम समिती श्री. शिवाजीराव ज्ञानदेव देशमुख, नगरसेविका तथा सभापती महिला व बालकल्याण समिती सौ. कोमल वैभव जानकर, नगरसेविका तथा उपसभापती महिला व बालकल्याण समिती सौ. पूनम अजिनाथ वळकुंदे, नगरसेविका सौ. ताई सचिन वावरे, नगरसेवक श्री. विजय बाजीराव देशमुख, नगरसेविका सौ. शोभा आबा धाईंजे, नगरसेवक श्री. आबा आप्पा धाईंजे, नगरसेविका सौ. राणी बबन शिंदे, नगरसेविका सौ. अर्चना आप्पासाहेब देशमुख, नगरसेविका सौ. प्राजक्ता शिवशंकर ओहोळ, नगरसेविका सौ. मंगल जगन्नाथ गेजगे, नगरसेविका सौ. मंगल दत्तात्रय केमकर, नगरसेविका सौ. पुष्पावती महादेव कोळेकर, नगरसेवक श्री. रघुनाथ पांडुरंग चव्हाण, स्वीकृत नगरसेवक श्री. आकाश भिमराव सावंत, श्री, गौरव नंदकुमार गांधी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख म्हणाले कि, देशात व राज्यात भाजपच्या विचाराची सत्ता असल्याने माळशिरस नगरपंचायतीच्या तिन्ही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून भरपूर निधी आणून माळशिरस नगरपंचायतीच्या हद्दीतील सर्व समस्या सोडवून माळशिरस शहराचा चेहरामोहरा बदलून आदर्श विकासाचं मॉडेल कसे बनवता येईल, यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी भविष्यामध्ये काम करणार असल्याचे सांगितले. माळशिरस नगरपंचायतला जवळजवळ सात कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला असल्याने सदरच्या विकासकामांचा शुभारंभ लवकरच करणार असल्याचे सांगून माळशिरस नगरपंचायतमध्ये कोणकोणती विकासकामे मंजूर कामे मंजूर झाली आहेत ते सांगितले.

त्यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत अकलूज रोड पेट्रोल पंपापासून ते जुना पानीव रोडपर्यंत रस्ता खडीकरण व बीबीएम/एमपीएम करणे या कामासाठी ४३,६९,९९० रू., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत सर्जे वस्ती पूल ६१ फाटा कॅनॉल पूर्व बाजू ते सागर देशमुख घर ते अकलूज रोड पर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी ७४,९६,४८२ रू., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत सुरेश पवार घर ते राजेंद्र भीमराव शिंदे (शिंदेवस्ती, जंगलेवस्ती, पिसेवस्ती) पर्यंतचा रस्ता एमपीएम करणे या कामासाठी ७४,३६,१५८ रू., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत पुणे पंढरपूर रोड ६० फाटा कॅनॉल ते मेन कॅनॉल पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी ७४,९४,८८९ रू., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत कोंडबावी रोड देवकर वस्ती ते ५९ फाटा कॅनॉल यादव वस्ती पर्यंतच्या अंतर्गत रस्त्यापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे व कोंडबावी रोड ते शंकर पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी ३३,८४,४३३ रू., महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत वार्ड क्र. १३ मधील शिंदेवस्ती रेल्वेलाईन ते दत्तामाई यांचे घर व दत्तामाई घर ते दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी १६,१९,८२३ रू., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत कचरेवाडी रोड ते मेडद मायनरपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी २४,४८,४३६ रू., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत कचरेवाडी रोड टेळे वस्ती ते खरात वस्ती रस्ता डांबरीकरण करणे व जानकर वस्ती ते दस्तगीर मुलाणी यांचे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी १३,६८,७९५ रू., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मेडद रोड ते मेडद मायनर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी ३५,९७,५८३ रू., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत आरिफ काझी ते विठ्ठल निकम यांच्या घरापर्यंत रस्ता व आरसीसी पाईप गटार करणे या कामासाठी १२,५३,२६१ रू., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत नगरपंचायत कार्यालय समोरील शहा कापड दुकान ते माऊली चौक अकलूज रोड पर्यंत आरसीसी गटार बांधणे या कामासाठी १३,१०,१३१ रू., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत वार्ड क्र. ७ मधील बंटी लवटे यांचे घर ते विठ्ठल मंदिर ते बळवंत गोडसे यांच्या घरापर्यंत आरसीसी पाईप गटार बांधणे, तसेच अकलूज रोड निहाल तांबोळी यांच्या घरापर्यंत भुयारी आरसीसी पाईप गटार बांधणे या कामासाठी १८,००,४९४ रू., १४ वा वित्त आयोग योजनेअंतर्गत गट नं. १७४९/२ मधील नगरपंचायतीच्या मालकीच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्र येथे अंतर्गत व जोड रस्ता करणे या कामासाठी २०,७७,०३६ रू., १४ वा वित्त आयोग योजनेअंतर्गत गट नं. १७४९/२ मधील नगरपंचायतीच्या मालकीच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्र येथे संरक्षक भिंत उभारणे या कामासाठी ६०,५५,७२७ रू., नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत वार्ड क्र.१४ मधील म्हसवड रोड समर्थ नगर एम.एस.ई.बी. बोर्ड कुलकर्णी हॉस्पिटल ते विठ्ठल कुलकर्णी नगर रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी २०,०९,९६५ रू., नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत वार्ड क्र. १४ येथील फुलेनगर घरकुल चाळ ते ५८ फाटा कॅनॉल ते बळीराम गेजगे वस्ती पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी १६,१०,०७० रू., स्वच्छ भारत अभियान अंतर्गत माळशिरस नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन केंद्र या ठिकाणी एम आर एफ शेड व कंपोस्टिंग पिट्स बांधणे या कामासाठी ६९,०२,५८० रू., नवीन नगरपंचायत योजनेअंतर्गत म्हसवड रोड जुना भांबुर्डी रस्ता येथील गोविंद पंडितराव गायकवाड यांच्या शेतापासून संत सावतामाळी मंगल कार्यालय पंढरपूर रोड पर्यंत आरसीसी गटार करणे या कामासाठी ४९,५०,७७५ रू. अशी कामे करण्यात येणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button