Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस पंचायत समितीच्या आवारात दसऱ्याच्या मुहूर्तावर दिव्यांग कक्षाची स्थापना

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस शहरात पंचायत समितीच्या आवारात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने आज दि. ५/१०/२०२२ रोजी दिव्यांग बांधवांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पंचायत समितीच्या आवारात दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आली. यावेळी हृदयसम्राट मदनसिंह मोहिते पाटील यांच्या प्रेरणेतून विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सभापती शोभाताई साठे, माजी उपसभापती प्रताप पाटील, माजी गट विकास अधिकारी श्रीकांत खरात, नूतन गट विकास अधिकारी विनायक जी. गुळवे या सर्वांच्या सहकार्याने दिव्यांग कक्ष स्थापन करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे दिव्यांगांचे दैवत बच्चूभाव कडू यांचे दिव्यांगांना नेहमीच सहकार्य असते. महिला जिल्हा अध्यक्ष संजीवनीताई बारंगुळे, शहाजी देशमुख जिल्हा संपर्क प्रमुख  प्रहार संघटना, गोरख जानकर माळशिरस तालुका अध्यक्ष, पिंटू भोसले सचिव, संदिपान चव्हाण, बाबासाहेब एकतपुरे, सुभाष पवळ आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button