माळशिरस पोलीस स्टेशन, उड्डाणपूल संघर्ष समिती आणि पुरंदावडे, सदाशिवनगर ग्रामस्थांची व सर्व पक्षीय नेते रास्ता रोको आंदोलनासाठी सज्ज
रास्ता रोको आंदोलनात तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती राहणार
सदाशिवनगर ( बारामती झटका )
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील पुरंदावडे सदाशिवनगर येथे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. दोन्ही गावातील ग्रामस्थ, व्यापारी व स्थानिक नागरिक यांचे म्हणणे आहे की, उड्डाणपूल प्लेट ऐवजी कॉलमचा करावा. यासाठी दोन्ही गावातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी उड्डाणपूल संघर्ष समिती स्थापन केलेली आहे. पुरंदावडे व सदाशिवनगर ग्रामस्थ आणि उड्डाणपूल संघर्ष समिती यांचा दि. 23/07/2022 रोजी रास्ता रोको आहे. रास्ता रोको आंदोलनाची तयारी झालेली आहे.
सदाशिवनगर, पुरंदावडे ग्रामस्थ संघर्ष समिती सज्ज झाली आहे. आंदोलनासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. नऊ वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलन कर्ते उपस्थित राहण्यास सुरूवात होईल.
प्लेटच्या उड्डाणपूलामुळे दोन्ही गावाचे अस्तीत्व धोक्यात येणार आहे. सर्व व्यापारी वर्गाचे व स्थानिक नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी सर्वांनी मिळून रास्ता रोको आंदोलन केले आहे. उड्डाणपुलामुळे होणाऱ्या अडचणी राज्य व केंद्र शासनापर्यंत पोहचायला पाहिजे. येवढाच या आंदोलनाचा उद्देश आहे.
पुरंदावडे सदाशिवनगर गावातील स्थानिक नागरिक, व्यापारी व नेते मंडळी टाळाटाळ करतील, अशा लोकांना जनता माफ करणार नाही. खड्यासारखे बाहेर काढून टाकतील. इतका जीवन मरणाचा प्रश्न बनला आहे.
तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय, रासप, शिवसेना, बंडखोर शिवसेना, बसपा अशा विविध पक्षातील राज्य, जिल्हा, तालुका पदावर कार्यरत असणारे नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आंदोलनाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng