माळशिरस येथील बंडगर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त मधुमेह, हृदयरोग, थायरॉईड व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील बंडगर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मधुमेह, हृदयरोग, थायरॉईड व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दि. १५ ऑगस्ट ते दि. १७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंडगर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, माऊली चौक ते नगरपंचायत रोड, तालीम जवळ, माळशिरस येथे करण्यात आले आहे.
या तपासणी शिबिरात मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. आशुतोष बंडगर आणि नेत्ररोग तज्ञ डॉ. राहुल बंडगर यांच्यावतीने तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये मधुमेह रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी, थायरॉईड तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी, पायांच्या नसांची तपासणी, चष्मा नंबर तपासणी, डायबेटीस रेटीनोपॅथी तपासणी, डोळ्याचा दाब व काच बिंदू तपासणी अशा सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहे. चक्कर येणे, धाप लागणे, घाम येणे, रक्तदाब, वजन कमी जास्त होणे, वारंवार लघवीला जावे लागणे, हात पायास मुंग्या येणे, अंगावर सूज येणे, थकवा येणे अशा रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng