माळशिरस येथे रानभाज्यांच्या महोत्सवाचे आयोजन…
माळशिरस (बारामती झटका)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दि. ९ ऑगस्ट ते दि. १५ ऑगस्ट दरम्यान तालुका कृषि अधिकारी माळशिरस कार्यालयामध्ये रानभाज्याचे माहीती प्रर्दशन व विक्री आयोजीत केली आहे. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. शेतावरील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या, फळभाज्या, कंदभाज्या व त्यामध्ये आवश्यक असणारी अनद्रव्ये मुलद्रव्ये, प्रथिने, औषधी गुणधर्म, व्हिटामिन, संप्रेरके व अॅन्टीऑक्सीडंट गुणधर्म सर्वांना परिचित व्हावे व तसेच या भाज्यावर कुठलेही बुरशीनाशक, किटकनाशके फवारणी न करता नैसर्गिकरित्या उगवलेल्या असतात हे सर्वाना परिचित करण्यासाठी याचे आयोजन केले आहे.


सेंद्रीय नैसर्गिकरित्या पिकवलेल्या भाज्याची ओळख, त्याचे महत्व शहरी भागांत पटवून देवून ग्रामीण भागात हि पिके पिकविण्यास शेतकरीबंधूंना लागवड व उत्पादनास चालणा देणे व शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या साधन बरोबर पौष्टीक, औषधी गुणधर्म असलेला रान भाजीपाला उत्पादन करणे हा उद्देश ठेवून या राणभाजी महोत्सावाचे आयोजन दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.३० ते सायं ५.३० या वेळेत केले आहे. तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. सतिश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी माळशिरस यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

