माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांची स्व. बकुळाबाई सुळ पाटील यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट.
मोरोची ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मोरोची येथील स्वर्गीय बकुळाबाई देवबा सुळ पाटील यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते, त्यानिमित्त सुळ पाटील परिवार यांची सांत्वन पर भेट घेतली.

त्यावेळेस धनगर आरक्षण कृषी समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ पाटील, मोरोचीचे माजी सरपंच जालिंदर सुळ पाटील, रमाकांत सुळ पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त उमेश सुळ पाटील यांच्यासह सुळ परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी मोरोची विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भीमराव साळुंखे, सरपंच समाधान गोरे, उपसरपंच बाळासो माने, नातेपुते नगरीचे ज्येष्ठ नेते चेअरमन अरुणराव पांढरे, मनोहर सुळ, आप्पा आण्णा सूळ आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
