Uncategorized

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना कोळेकर दांपत्य यांनी आवर्जून सन्मान करून आनंदाने पेढा दिला.

कण्हेर गावची लेक माळशिरस शहरातील कोळेकर परिवारांची सून सौ अलकाताई यांनी तीन वर्षांनंतर घरात गौराई उभ्या केल्या.


माळशिरस ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा माळशिरस शहरातील श्री यशवंत अण्णा कोळेकर यांनी सन्मान करून आनंदाने पेढा दिला यावेळी सौ अलकाताई कोळेकर भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक आबा धाईंजे अहिल्यादेवी विकास संस्थेचे चेअरमन संदीप पाटील, युवा नेते विशूभैय्या पाटील, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, भाजप शहर उपाध्यक्ष राजू वळकुंदे आमदारांचे विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे आदी मान्यवरांसह जनता दरबारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणीसाठी जनता दरबाराचे आयोजन केले जाते त्यावेळेस युवा नेते विशू भैया पाटील यांनी यशवंत कोळेकर यांच्या पत्नी सौ.अलकाताई कोळेकर यांच्या पायाच्या गुडघ्या विषयी माहिती सांगितली दोन-तीन वर्षापासून ऑपरेशन विना कोळेकर परिवार त्रस्त आहेत तीन लाख रुपये ऑपरेशनचा खर्च असल्याने ऑपरेशन करणे परिस्थितीने शक्य नाही असे सांगितल्यानंतर लोकप्रिय आमदार यांनी पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून सौ अलकाताई कोळेकर यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया मोफत केलेली आहे . त्यामुळे त्यांनी गौराई गणपती घरामध्ये उत्सव आनंदाने केलेला आहे मोफत शस्त्रक्रिया झालेली असल्याने कोळेकर दांपत्य यांनी आमदारांचा सन्मान करून आनंदाने पेढा उपस्थित सर्वांना देण्यात आलेला आहे.


कण्हेर तालुका माळशिरस येथील दादासो कृष्णा माने यांची कन्या अलकाताई यांचा माळशिरस शहरातील यशवंत अण्णा कोळेकर यांच्याशी 11 /12/ 1995 रोजी विवाह झालेला आहे त्यांना अक्षय व अजय दोन मुले आहेत यशवंत यांचा 60 फाटा माळशिरस या ठिकाणी किराणा दुकानाचा व्यवसाय आहे त्यांचे दुसरे दोन बंधू यांचाही माळशिरस शहरात किराणा दुकान व्यवसाय आहे दीड एकर शेती आणि किराणा दुकान यावर कोळेकर दांपत्ये यांनी अक्षय यास बीएससी ऍग्री व अजय बीएससी झालेले आहेत प्रतिकूल परिस्थितीत मुलांचे शिक्षण पूर्ण करून उद्योग व्यवसायानिमित्त पुणे व औरंगाबाद येथे दोन्ही मुले आहेत गेल्या तीन वर्षांमध्ये अलकाताई पाणी भरीत असताना पाय लचकून त्यांच्या गुडघ्याला इजा झालेली होती गुडग्याची वाटी चिरलेली असल्याने चालता येत नव्हते आणि परिस्थितीने ऑपरेशन करता येत नव्हते तीन लाख रुपये खर्च होता अशा कठीण परिस्थितीत तीन वर्षाचा काल लोटलेला होता.

आमदार राम सातपुते यांच्या सहकार्यामुळे अलकाताई यांचे गुडघ्याचे ऑपरेशन होऊन पायावर उभ्या राहू शकल्या त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे आमदारांचा सन्मान करताना उपस्थित होत्या घरामध्ये गौरी गणपती अडचणीमुळे उभ्या केलेल्या नव्हत्या यावर्षी स्वतः पायावर उभा राहिलेल्या असल्याने त्यांनी गौराई घरामध्ये उभ्या केलेल्या आहेत त्यांना मदत कुमारी गौरी सुरेश कोळेकर यांनी केलेली आहे आमदार राम सातपुते यांच्या कामगिरीमुळे खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यात राम राज्य आहे असे सर्वसामान्य जनतेची भावना झालेली आहे माळशिरस तालुक्यातील अनेक अडचणीच्या लोकांची मोफत ऑपरेशन व वैद्यकीय खर्च केलेला असल्याने माणसातील देव माणूस म्हणून आमदार राम सातपुते यांच्याकडे जनता पाहत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button