Uncategorized

माळशिरस विधानसभेत राम सातपुते व संकल्प डोळस यांच्यात लढत, तर विधान परिषदेवर रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या ऐवजी उत्तमराव जानकर..

माळशिरस ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे विद्यमान आमदार राम सातपुते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस यांच्यात आगामी माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत लढत होईल तर विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याऐवजी जनतेचे आमदार उत्तमराव जानकर यांची वर्णी लागणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. भाजप व राष्ट्रवादी यांच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात राजकीय चढाओढ सुरू आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा मागे कसा असणार, सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील यांचे अनेक वर्ष वर्चस्व होते. माळशिरस विधानसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील गटाने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माळशिरस विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व भाजपचे आ. राम सातपुते यांना करण्याची संधी मिळालेली आहे. आ. राम सातपुते यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केलेला आहे. मोहिते पाटील यांची भाजपमध्ये घुसमट होत असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात असताना वेगळे होते. भाजपमध्ये आल्यानंतर वेगळी ध्येयधोरणे असल्याने अडचणी वाढत आहेत. कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सूर आहे. असे असताना देशाचे नेते शरदचंद्रजी पवार आणि राज्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील बारामती येथील कृषी प्रदर्शनात एकत्र आलेले असल्याने राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चेमध्ये वाढ झालेली आहे.

माळशिरस विधानसभेचे माजी आमदार स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून मोहिते पाटील परिवार यांच्याशी जवळीकता वाढलेली असल्याचे अनेक कार्यक्रमांमधून पहावयास मिळत आहे. तर माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत अल्पशा मताने पराभव झालेले जनतेचे आमदार उत्तमराव जानकर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू असून अनेक वेळा सोशल मीडियावर जनतेने पाहिलेले आहे.

भाजपकडून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी मिळण्याचे जवळ जवळ निश्चित झालेले आहे. उत्तमराव जानकर यांनी लोकसभेच्या वेळी भाजपचे काम केलेले होते. विधानसभेला भाजपच्या विरोधात होते. सध्या मोहिते पाटील यांची मानसिकता वेगळी आहे, त्यामुळे राजकीय फेरबदल होऊन माळशिरस तालुक्याचे राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे. उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर संधी मिळणार आहे. मोहिते पाटील गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर वाढलेल्या जवळीकतेमुळे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार संकल्प डोळस यांच्यासोबत निवडणुकीत गेल्यानंतर भाजपकडून उत्तमराव जानकर यांना पाठबळ देऊन येणाऱ्या निवडणुकीत राम सातपुते व संकल्प डोळस यांच्यात संभाव्य लढत होऊन भाजपचे विधान परिषदेचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याऐवजी जनतेचे आमदार उत्तमराव जानकर यांची वर्णी लागणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे..

सदरची बातमी राजकीय भूकंप घडवणारी आहे. मात्र, आज एक एप्रिल असल्याने एप्रिल फुल केलेले आहे. आजपर्यंत एप्रिल फुल केलेले फुल एप्रिल झालेले आहे. त्यामुळे भविष्यात असेसुद्धा घडू शकते, तोपर्यंत वाचकांनी एप्रिल फुलच समजावे..

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort