“मी शरदचंद्रजी पवार यांना लपून भेटलो नाही”- अजितदादा पवार
मुंबई (बारामती झटका)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात पुणे येथे उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी बंद दाराआड चर्चा झाली. या गुप्त भेटीबाबत अजितदादा पवार यांना विचारले असता ते चांगलेच संतापले.
मी शरदचंद्रजी पवार यांना काही लपून भेटलेलो नाही, असे म्हणाले. पुण्याच्या बैठकीचे कोणी मनावर घेऊ नका. पवारसाहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका, असे यावेळी अजितदादा पवार म्हणाले.
अजितदादा पवार मंगळवारी कोल्हापुरात होते. शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर, मराठा आरक्षण संबंधी बैठक झाली. त्यानंतर त्यांनी शरदचंद्रजी पवार भेटीबाबत माहिती दिली. दरम्यान, जयंत पाटील हेही यावेळी उपस्थित होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चांवर आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वत: त्या दिवशी काय झाले, याची माहिती दिली. चोरडीया यांचे वडील शरदचंद्रजी पवार यांचे क्लासमेट होते. त्या दिवशी ते व्हीएसआयचा कार्यक्रम संपवून येणार होते. मी चांदणी चौकातील कार्यक्रम संपवून येणार होतो. त्या दिवशी शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही होते. चोरडीया यांनी आम्हाला जेवायला बोलावलं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो होते, असंही अजित पवार म्हणाले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng