Uncategorized

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर.


संतोषआबा वाघमोडे उपजिल्हा प्रमुख, बापूराव सरक युवा सेना तालुकाप्रमुख, प्रसन्नजीत घुले युवा सेना उपजिल्हा अधिकारी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

माळशिरस तालुक्यातील राजकीय घराण्यातील युवा पिढी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला अच्छे दिन येणार आहेत.

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. नरेशजी म्हस्के, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख श्री. शिवाजीराव सावंत सर, सोलापूर जिल्हा प्रमुख श्री. चरणराज चवरे, श्री. महेशजी चिवटे, माळशिरस तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख बापूराव क्षिरसागर यांच्या उपस्थितीमध्ये माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक संतोषआबा वाघमोडे यांची निवड करण्यात आले.

याचबरोबर युवा सेना सोलापूर जिल्हा प्रमुख पदी प्रसन्नाजीत घुले, माळशिरस तालुका युवा सेना तालुका प्रमुखपदी बापूराव आप्पा सरक यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक सुरेशआबा वाघमोडे, विद्यमान नगरसेवक जगनाथ गेजगे, यशवंत मोहिते, शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, उत्तम भाऊ शेगर, दिलीप मंजुळे, योगेश पुराणिक, बाळासाहेब वाघमोडे, अमर पठाण, संतोष मोटे, सचिन पापत आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

माळशिरस तालुक्याच्या जडणघडणीतील राजकीय घराण्यातील युवा पिढी यांनी शिवसेनेची जबाबदारी घेतलेली असल्याने माळशिरस तालुक्यात भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेब यांची शिवसेनेला अच्छे दिन येणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button