मेडद गावच्या आदित्य रघुनाथ राऊत या विद्यार्थ्याचे जी मेन्स एक्झाम 2023 परीक्षेत घवघवीत यश.
भैरवनाथ विद्यालय मेडदचे अध्यक्ष बाळासाहेब लवटे पाटील व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी सन्मान करून दिल्या शुभेच्छा
माळशिरस ( बारामती झटका )
मेडद ता. माळशिरस येथील विद्यार्थी आदित्य रघुनाथ राऊत यांने जी मेन्स एक्झाम 2023 (JEE MAINS EXAM 2023) परीक्षेत क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी मधून 98.28% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालला आहे.
मेडद शैक्षणिक विकास संस्था मेडद व श्री भैरवनाथ विद्यालय मेडद या शाळेत आदित्य रघुनाथ राऊत यांनी शिक्षण घेतलेले असल्याने संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब साहेबराव लवटे पाटील यांच्या शुभहस्ते आदित्य राऊत याचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री. रघुनाथ राऊत, श्री. रामचंद्र यादव, श्री. संतोष काळे, श्री. विठ्ठल यादव, श्री. सचिन लवटे, श्री. गोविंद यादव, श्री. कुंडलिक झंजे, श्री. दादा वळकुंदे, मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत तेरखेडकर, शिक्षक श्री. अशोक गायकवाड, सौ. सुषमा झंजे, श्री. विष्णु सोनटक्के, श्री. उपेंद्र केसकर, श्री. रमेश साळवे आदी उपस्थित होते.
सत्कार कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष बाळासाहेब लवटे पाटील यांनी बोलताना सांगितले की, संस्थेतील शिक्षकांनी मुलांना चांगल्या प्रकारे शिकवून चांगले संस्कार केलेले असल्याने या संस्थेतील विद्यार्थी बाहेर शिक्षण घेण्यासाठी गेल्यानंतर चांगल्या प्रकारे यश संपादन करून गावाचे व संस्थेचे नाव उज्वल करीत आहेत. अशा विद्यार्थ्यांचा संस्थेमध्ये सन्मान करताना अभिमान वाटत आहे. आदित्य राऊत याने प्रतिकूल परिस्थितीत पुढील शिक्षण घेण्याकरता अभ्यास करून यश संपादन केलेले आहे. भविष्यात काही मदत लागल्यास संस्था सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे, असे सांगून पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नवनाथ निवृत्ती चंदनशिवे सर यांनी केले तर आभार श्री. बाळासो माने सर यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng