Uncategorized

मोटेवाडी माळशिरस येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान संपन्न होणार…

माळशिरस (बारामती झटका)

मोटेवाडी ता. माळशिरस येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रविवार दि. 09/04/2023 रोजी दुपारी 03 वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोटेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व श्रीनाथ विद्यालयाचे संचालक युवा नेते श्री. महादेव माने व समस्त ग्रामस्थ व यात्रा कुस्ती कमिटी यांनी आयोजन केलेले आहे. सदरच्या कुस्ती मैदानाचे संयोजन श्री. आप्पासाहेब माने व श्री. नितीनजी मोटे हे करणार आहेत. तर विशेष सहकार्य ॲड. संजय माने, प्राध्यापक दादासाहेब खरात, काकासाहेब माने, आप्पा मोटे, राघू खरात, नाना देवकते, नवनाथ मोटे, गोरख माने, पंपू पालवे, श्रीकांत वायदंडे, ज्योतीराम दडस, नाना माने, विलास मोटे, नाना दडस, महादेव कोळेकर, बापू माने, लक्ष्मण रुपनवर, नवनाथ दडस, धनाजी सरगर, नितीन हांडे, मारुती माने, समाधान वायदंडे, समाधान माने, उत्तम मोटे, आप्पा देवकते, दादा कोळेकर, बाळू माने, शरद माने, तानाजी मोटे, नवनाथ माने, नामदेव हांडे, लक्ष्मण माने, धनाजी सरगर, मधुकर देवकते, दत्तू रुपनवर, दादा हुलगे, पोपट माने, विठ्ठल माने, नवनाथ पिसे, ज्ञानदेव कोळेकर, ज्ञानदेव खरात, अनिल माने, ऋतिक हांडे, साधू हांडे, पोपट सरगर, हनुमंत रामदास, राजेंद्र माने, राजेंद्र पालवे, सागर माने, आजिनाथ पालवे, बळवंत देवकते, काका देवकते, पोपट रुपनवर, पंपू माने, पांडुरंग तोरणे, श्रीकांत हांडे, धवन नामदास यांचे विशेष सहकार्य राहणार आहे.

सदर कुस्ती मैदानामध्ये नगराध्यक्ष मांडवे गावचे माजी सरपंच तानाजी पालवे यांच्यावतीने पै. मनोज माने कुर्डूवाडी व पै. सतपाल सोनटक्के कंदर यांच्यात लढत होणार आहे. अज्ञान बापू मोटे व अकलूज ग्रुप ओंकार साखर कारखाना चांदापुरी पोलीस सब इन्स्पेक्टर श्री. अनिल माने यांच्यावतीने पै. आशिष वावरे पुणे व पै. मामा तरंगे कुर्डूवाडी यांच्यात लढत होणार आहे. माळशिरसचे नगराध्यक्ष वस्ताद विजय देशमुख, युवा नेते गोरख देशमुख, लालासो बाजार यांच्यावतीने पै. अप्पा वळकुंदे माळशिरस व पै. परमेश्वर गाडे खुडूस यांच्यात लढत होणार आहे.

माळशिरसचे उपनगराध्यक्ष अजिनाथ वळकुंदे, नगरसेवक सचिन वावरे, नगरसेवक प्रवीण केमकर यांच्यावतीने पै. ओम माने खुडूस व पै. बापू झंजे सदाशिवनगर यांच्यात लढत होणार आहे. गोरडवाडीचे सरपंच विजय गोरड, खुडूसचे माजी उपसरपंच बाजीनाना सरगर, बाळासाहेब वाघमोडे यांच्यावतीने पै. प्रकाश कोळेकर सदाशिवनगर व पै. बिरू मोटे वाखरी यांच्यात लढत होणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. संजय माने, तालुका अध्यक्ष वैजनाथ पालवे, युवा नेते तानाजी हांडे यांच्यावतीने पै. रवी रुपनवर माळशिरस व पै. आकाश भुजबळ नातेपुते यांच्यात लढत होणार आहे. मोटेवाडीचे माजी सरपंच जयवंत मोटे, युवा नेते रावसाहेब खरात, युवा नेते माऊली हांडे यांच्यावतीने पै. संग्राम माने माळशिरस व पै. वैभव कोंडलकर म्हसवड यांच्यात लढत होणार आहे. प्राध्यापक देविदास वायदंडे सर, माळशिरसचे नगरसेवक समिता जानकर, कचरेवाडीचे माजी सरपंच रामभाऊ कचरे यांच्यावतीने पै. सोमनाथ हांडे माळशिरस व पै. किरण कांबळे झंजेवाडी यांच्यात लढत होणार आहे. यावेळी उद्घाटनाची कुस्ती पै. रणवीर रुपनवर माळशिरस व पै. लखन वाघमोडे माळशिरस आणि पै. अक्षय मोटे माळशिरस व पै. आदित्य कोकरे माळशिरस यांची उद्घाटनाची कुस्ती होणार आहे.

तरी कुस्तीप्रेमी यांनी पै. सोमा मोटे 9766036006, पै. युवराज मोटे 8208150157, पै. भीमराव मोटे 9011494927, पै. कैलास हांडे 7507903001, पै. तुषार मोटे 9561330327, पै. अमोल कोळेकर 8530838233 यांच्याशी संपर्क साधावा. कुस्तीचे समालोचन पै. हनुमंत शेंडगे मांडवे सदाशिवनगर हे करणार आहेत. तरी सर्व कुस्तीप्रेमी पैलवान, वस्ताद यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुस्ती मैदानाचे आयोजक मोटेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व श्रीनाथ विद्यालय माळशिरसचे संचालक युवा नेते महादेव माने यांनी केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button