Uncategorized

मोरोची गावातील बकुळाबाई देवबा सूळ यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.

धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सूळ यांना मातृशोक.

मोरोची ( बारामती झटका )

मोरोची येथील बकुळाबाई देवबा सूळ यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने सोमवार दि. ३१/१०/२०२२ रोजी दुपारी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ व मोरोची गावचे माजी सरपंच जालिंदर सूळ यांच्या त्या मातोश्री होत्या.

त्यांच्यावर मोरोची हद्दीतील शिंगणापूर पाटी जवळील निवासस्थानाशेजारी शेतामध्ये सायंकाळी ७ वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

1,048 Comments