म्हसवड-धुळदेव कॉरिडॉरमध्ये गारवाडचा समावेश करून माळशिरस तालुक्यात स्वतंत्र एमआयडीसीसाठी प्रयत्न करणार – पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर.
माढा लोकसभेचे पाणीदार व कार्यतत्पर खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची माळशिरस तालुक्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न होणार
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील निरा-देवधरचे पाणी २२ गावांना मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार – पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर.
माळशिरस (बारामती झटका)
म्हसवड येथील केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणाऱ्या बंगलोर-मुंबई इकॉनॉमीक कॉरिडॉर तथा नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर पर्यायी पुणे-बंगळूर व पुणे-पंढरपूर या महामार्गालगत आहे. यामुळे हा प्रकल्प शेतकरी आणि औद्योगिक वाढीपासून दूर असलेल्या या भागातील लोकांसाठी उपयुक्त ठरेल. द्राक्ष, डाळिंब आणि इतर फळे तसेच भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाशवंत मालासाठी सुलभ बाजारपेठ आणि जलद वाहतूक मिळेल. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष घालून म्हसवड-धुळदेव कॉरिडॉरमध्ये गारवाडचा समावेश व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार असल्याचे माढा लोकसभेचे पाणीदार कार्यतत्पर खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी सुसंवाद साधत असताना सांगितले.
पुढे बोलताना पाणीदार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, आगामी इकॉनॉमिक कॉरिडॉर तथा नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकसित झाल्यानंतर माळशिरस तालुक्यात उद्योग व्यवसायाला चालना व युवकांच्या हाताला काम मिळून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचाही प्रश्न मिटणार आहे. तालुक्यात हजारो एकर शेती महामंडळाची जमीन व अनेक ठिकाणी नापीक व माळरान असणाऱ्या जमिनीमध्ये माळशिरस तालुक्यासाठी स्वतंत्र एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून माळशिरस तालुक्यातील इंग्रज कालीन असणारी लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे या रेल्वेचाही प्रश्न मिटलेला आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील निरा-देवधर प्रकल्पातील २२ गावांचा प्रश्न मार्गी लावून त्यामधील उर्वरित बारा गावांचा सुद्धा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आवर्जून सांगितले.
माळशिरस तालुक्यामध्ये आळंदी -पुणे-पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व देहू-पुणे-पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या दोन्हीही महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही महामार्ग देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, वाहतूक व रस्ते मंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस या सर्वांनी विशेष लक्ष घालून महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आणलेले आहे. माझ्या कालावधीमध्ये कामे पूर्ण होत असल्याने समाधान वाटत असल्याचे सांगितले.
माळशिरस तालुक्यामध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण, वन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, एमएसईबी विभाग, पोलीस उपअधीक्षक, अशा सर्व विभागाचे अधिकारी व ग्रामसेवक तलाठी आणि तालुक्यातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी व तक्रारदार ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक लवकरच घेणार असल्याचे सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This piece was both informative and amusing! For more, visit: LEARN MORE. Keen to hear everyone’s views!