यशवंतनगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
यशवंतनगर (बारामती झटका)
आज मंगळवार दि. ३ जानेवारी २०२३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महर्षि संकुल, यशवंतनगर, महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग येथे साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. वाघ मॅडम, प्रति सावित्री बनलेल्या विद्यार्थिनी, शिक्षक वृंद यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतील विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कु. स्नेहल बोरावके, कु. धनश्री काळे, कु. प्रणिती रासकर यांनी यावेळी बोलताना सावित्रीबाई फुले यांचे बालपण, शिक्षण व त्यांचे जीवनकार्य याविषयी माहिती दिली. तसेच प्रति सावित्री बनलेल्या विद्यार्थिनी कु. धनश्री काळे व कु. सृष्टी गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली.

तसेच यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक श्री. बाबर आर. डी. यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या काळातील सामाजिक परिस्थितीविषयी माहिती दिली. तसेच अनिष्ट रूढी, परंपरा याविषयी देखील माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भक्ती जाधव व कु. सृष्टी गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. काजल गोरे हिने केले. या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता ८ वी तुकडी – ब या वर्गाने केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng