Uncategorizedताज्या बातम्या

युवासेना विस्तारक उत्तम आयवळे यांची संभाजी ब्रिगेड कार्यालयास सदिच्छा भेट

टेंभुर्णी (बारामती झटका)

शिवसेना व संभाजी ब्रिगेड युती जाहीर झाल्यानंतर प्रथमच एकत्रितपणे होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेचे विस्तारक तथा मा.नगरसेवक अंबरनाथ न.पा. उत्तम आयवळे यांनी आज टेंभुर्णी येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी स्वागत केले.

यावेळी बोलताना उत्तम आयवळे म्हणाले कि, संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीच्या माध्यमातून पहिलीच निवडणुक होत असून यात आमच्यासह सर्व सुटा पॅनलचे उमेदवार बहुमताने विजयी होणार असुन येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतही आम्ही एकत्रितपणे काम करु. यावेळी सचिन जगताप जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, युवासेना समन्वयक किशोर देशमुख, संभाजी ब्रिगेडचे योगेश मुळे शहर उपाध्यक्ष, महेश देशमुख शहर संघटक, अजय गायकवाड तालुकाध्यक्ष का.आ, विजय काका काळे, बालाजी देशमुख आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button