रत्नत्रय शिक्षण संकुलनात भगवान वर्धमान महावीर जन्मकल्याणक उत्सव मोठया उत्साहात साजरा
मांडवे (बारामती झटका)
सोमवार दि.3 एप्रिल 2023 रोजी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित, रत्नत्रय इंग्लिश मेडीयम स्कुल, विद्यालय व ज्यू. कॉलेज, मांडवे येथे भगवान वर्धमान महावीर जन्मकल्यानक उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध प्रवचनकार चेतन दोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
आजची तरुण पिढी ही व्यसनांच्या आहारी जात आहे. या तरुण पिढीला व्यसनापासुन दूर ठेवण्यासाठी शिक्षक व पालक यांनी कोणकोणती पावले उचलली पाहिजेत, याबद्दल सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलालदादा दोशी, संस्थेचे सचिव प्रमोदभैय्या दोशी, संस्थेचे मार्गदर्शक विरकुमार दोशी, विपुल दोशी, संदेश गांधी, संस्थेचे समन्वयक श्रीकृष्ण पाटील सर, मुख्याध्यापक दैवत वाघमोडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैवत वाघमोडे सर यांनी केले व आभारप्रदर्शन श्रीकृष्ण पाटील सर यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
