रत्नत्रय शैक्षणिक संकुलात बाजार दिवस उत्साहात साजरा
मांडवे (बारामती झटका)
रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे शनिवार रोजी सकाळी ९.०० वा. बाजार दिवस चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाघाटन डॉ. रणजीत गजानन गुरव (शास्त्रज्ञ, टेक्सास स्टेट युनिव्हर्सिटी टेक्सास युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अनंतलाल दोशी (संस्थापक अध्यक्ष, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर) हे होते.


सदर प्रसंगी सदाशिवनगरचे नूतन सरपंच श्री. विरकुमार दोशी, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद दोशी, प्रशालेचे सदस्य वैभव शहा, अर्जुन धाईंजे, अभिमान सावंत, विष्णू भोंगळे, रामदास कर्णे, बबन गोपणे, गजानन गोरे, माणता पाटील, बाहुबली दोशी, तुषार गांधी, सुरेश धाईंजे, वसंतराव ढगे, शिवाजी लवटे, तानाजी पालवे, तुषार ढेकळे, सौ. मृणालणी दोशी, सौ. पूनम दोशी, धनश्री दोशी, सारिका राऊत सदाशिवनगर ग्रामपंचायतचे नूतन सदस्य, प्रशाला कमिटी सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, नफा-तोटा यातून व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी हा उपक्रम प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो. बाजारात विविध प्रकारचे ५० स्टॉल लावले होते. या बझार डे मध्ये १ लाख ४५ हजाराची उलाढाल झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दैवत वाघमोडे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. श्रीकृष्ण पाटील यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng