रत्नत्रय हे संस्कारक्षम पिढी घडवणारे एकमेव शैक्षणिक संकुल – प्रीतमभाई शहा
मांडवे (बारामती झटका)
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. गुरुवार दिनांक २६ जानेवारी हा दिवस रत्नत्रय शैक्षणिक संकुल, मांडवे येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक प्रीतमभाई शहा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. चालू शैक्षणिक वर्षातील क्रीडा सप्ताहातील यशवंत विद्यार्थी व राज्यस्तरावर खेळलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. यानंतर संकुलातील सेमी विभाग व इंग्रजी माध्यमाच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.

सदर प्रसंगी बोलताना प्रमोद भैय्या दोशी म्हणाले की, “संस्थेच्या प्रगतीमध्ये विद्यार्थी, पालक व उपस्थित मान्यवरांचे मोलाचे योगदान आहे. यापुढेही प्रत्येकाने स्वतःची योग्य ती जबाबदारी घेऊन संस्थेची प्रगती करून नाव मोठे करावे.”
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी म्हणाले “आपण ज्याप्रमाणे धार्मिक सण, उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करतो, त्याचप्रमाणे भारतभर हा राष्ट्रीय सण उत्सव साजरा करतात.”

प्रितमभाई शहा म्हणाले “की रत्नत्रय शैक्षणिक संकुलात चारित्र्यवान नागरिक घडवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. हेच विद्यार्थी भविष्यात आदर्श भारत घडवतील. या शैक्षणिक संकुलात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार होत आहेत. त्याचमुळे विद्यार्थ्यांना हक्कापेक्षा कर्तव्याची जाणीव होणार आहे व त्यामधून एक खूप मोठी क्रांती होणार आहे”.
सदर प्रसंगी प्रितमभाई शहा, विद्युत शहा, अनंतलाल दादा दोशी, सतीश दोशी, मिहीर गांधी, महावीर शहा, अजितकाका दोशी, सदाशिवनगरचे संरपच विरकुमार दोशी, प्रमोद दोशी, वैभव शहा, सतीश बनकर, रामदास गोफणे, रवीकाका कुलकर्णी, सुरेश धाईंजे, महादेव सपकाळ सर, निवास गांधी, अमित गांधी, अभिजीत दोभाडा, मृणालिनी दोशी, पुनम दोशी, पार्वती जाधव, रेश्मा गांधी, प्रशाला कमिटीचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैवत वाघमोडे सर यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश हांगे सर यांनी केले. तसेच यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
