Uncategorizedताज्या बातम्या

रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाची १४ ऑगस्टला सर्वसाधारण सभा

बदलापूर (बारामती झटका) गुरुनाथ तिरपणकर यांजकडून

बदलापुरमधील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हावासीय मंडळाचे बदलापूरकर आजीव सदस्य तसेच सर्वसाधारण सदस्य असणा-या रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १४/०८/२२रोजी सायंकाळी ५ वा., श्री अपार्टमेंट, शाॅप नं. ४, दुसरा मजला, अभिनव बँकेच्यावर, गांधी चौक, बदलापूर (पुर्व) येथे आयोजित केलेली आहे.

या वार्षिक सभेत २० व्या वार्षिक सभेचा कार्यवृत्तांत वाचुन कायम करणे. दि. ३१ मार्च २०२२ अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल, उत्पन्न खर्चाचे ताळेबंद पत्रक स्विकारणे व त्यास मंजुरी देणे, सन २०२१-२०२२ या वर्षाच्या हिशोब तपासणी अहवालाची नोंद घेणे, २०२२-२०२३ या वर्षासाठी हिशोब तपासणीसांची व हिशोब लेखणिकाची नेमणूक करणे व अध्यक्षांच्यावतीने आयत्यावेळी येणा-या विषयांवर चर्चा करणे, अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मंडळाच्या बदलापुरकर आजीव-सर्वसाधारण सभासदांनी या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व चिटणीस मंगेश कदम यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button