रब्बी ज्वारी, सुर्यफुल, मका, गहू, हरभरा बीज प्रक्रिया शिवाय पेरणी करू नये – सतिश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी
माळशिरस (बारामती झटका)
शुद्ध बिया पोटी फळे रसाळ गोमटी, असे असले तरी बियाणे जेव्हा पेरणी किंवा टोकन केले जाते तेव्हा त्याला उगवणीपासून वाढीपर्यत जमिन, हवा, पाणी यामधील असंख्य जीवाणू, किटाणू पशु, पक्षी, रोग, जंतू, किडीशी सामना केल्यानंतर उगवन व वाढ होते. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी हेक्टरी रोपे संख्या हा महत्वाचा घटक आहे व हे राखण्यासाठी या पिकांना बुरशीनाशके किडी / किडनाशके, रोगनाशके, जैविक घटक, उत्पादन वाढीसाठी बीजप्रक्रिया क्रमप्राप्त आहे. म्हणून रब्बी प्रमुख पिके बीज प्रक्रिया शिवाय न पेरण्याचे टोकण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे.

बीज प्रक्रिया हा कमी खर्चाचा उत्पादन वाढीचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. ज्वारी, मका, गहू, सुर्यफुल या पिकांस किडी व रोगापासून बियाणे व नवतीचे प्रतिबंधात्मक संरक्षण करण्यासाठी प्रथमतः २ ग्रॅम कॅप्टन प्रति किलो बियाणे बीज प्रक्रिया करावी. बुरशी व बुरशीजन्य रोगांपासून बीयाणे संरक्षण व प्रतिबंध करण्यासाठी २ ग्रॅम ट्राकोड्रर्मा ची प्रति १ किलो बियाणेस बीज प्रक्रिया करावी. हवेतील नत्र जमिनित स्थिर करण्यासाठी प्रति १० किलो बियाणेस २५० ग्रॅम अझटोबॅक्टर जीवाणू + ५० ग्रॅम गुळ + २ थेंब निळ व पाणी याची पेस्ट करून बीज प्रक्रिया २४ तास अगोदर पेरणीपूर्व करून सावलीत सुकवून केल्याने नत्र स्थिरकरणासह १०% उत्पादनात वाढ होते.


याचप्रमाणे जमिनित मध्यम ते भरपुर प्रमाणात असलेला व जास्त सामूमुळे विद्राव्य स्वरूपातील स्फुरद पिकांस उपलब्ध करण्यासाठी प्रति १० किलो बियाणेस २५० ग्रॅम पी एस बी + ५० ग्रॅम गुळ + २ थेंब निळ व पाणी बीज प्रक्रिया केल्याने स्फुरद उपलब्धता वाढते. ३० मात्रा व खर्च बचत होऊन १० उत्पादनात व प्रतमध्ये वाढ होते.
हरभरा पीक – ३ ग्रॅम कॅप्टन किंवा बाविस्टीन प्रति किलो बियाणे बीजप्रक्रियामुळे बुरशीजन्य रोगापासून प्रतिबंध होतो. हरभरा या पिकांस हवेतील नत्र जमिनित स्थिर करण्यासाठी नत्राची ५०% बचत व १०% उत्पादन वाढीसाठी प्रति १० किलो बियाणे २५० ग्रॅम रायझोबीएम + ५० ग्रॅम गुळ + २ थेंब निळ व पाणी यांचे द्रावणाची बीजप्रक्रिया करावी.
जमिनीतील स्फुरद उपलब्धता वाढविणे – स्फुरद खताची ४०% बचत व १५% उत्पादन वाढीसाठी २५० ग्रॅम पी.एस.बी + ५० ग्रॅम गुळ + २ थेंब निळ व पाणी यांची बीज प्रक्रिया पेरणीपूर्व २४ तास करून सावलीत सुकवून पेरणी व टोकण करावी. बीज प्रक्रिया करताना प्रथमत: बुरशीनाशके नंतर किड / किटक नाशके व शेवटी जैविक बीज प्रक्रिया करावी. किडी व रोग प्रतिबंधात्मक उपाय, नत्र स्थिरीकरण, स्फुरद उपलब्धता वाढवून १0 ते १५% उत्पादनात वाढीची हमी असणाऱ्या ह्या बीज प्रक्रिया प्रति हेक्टर ५० रु. ते १०० रु. अत्यल्प खर्चात करून उत्पादन व प्रत वाढविण्याचे आवाहन प्र. तालुका कृषि अधिकारी श्री. सतीश कचरे यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
