ताज्या बातम्याराजकारण

राष्ट्रवादीचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व भाजपचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या चर्चेकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष..

विधान परिषद सभागृहात लक्षवेधी सुरू असताना माढा लोकसभा मतदारसंघातील घडामोडींची चर्चा सुरू असणार…

मुंबई ( बारामती झटका )

विधान परिषदेचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर व भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांची विधानपरिषद सभागृहात लक्षवेधी विषयावर आमदारांची चर्चा सुरू असताना माढा लोकसभा मतदार संघातील घडामोडींची चर्चा सुरू असल्याची त्यांच्या चर्चेतील हावभावावरून जाणवत आहे. माढा लोकसभेचे पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर समदुखी असणारे रामराजे नाईक निंबाळकर व रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या चर्चेकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. तर, माढा लोकसभा मतदार संघातील जनता व मतदार यांच्यामध्ये काय चर्चा झाली असेल, तर्क वितर्कला उधान आलेले आहे.

माढा लोकसभा मतदार संघ निवडणुकीत देशामध्ये चर्चेत आलेला होता. मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभेची पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे मोहिते पाटील परिवारातील लहानथोर, सर्व सदस्य यांनी निवडणुकीत अहोरात्र प्रयत्न करून जाहीर सभेमध्ये एक लाखापेक्षा जास्त लीड देणार असे सांगून लीड दिलेले होते. त्यामुळे पहिल्यांदाच माढा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यातून भाजपकडे आलेला होता. मोहिते पाटील परिवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणे आणि सोलापूर जिल्ह्यातील पारंपारिक विरोधक संजयमामा शिंदे यांची राष्ट्रवादीकडून उमेदवारी असल्याने दोन्ही हेतू साध्य करण्यामध्ये मोहिते पाटील यशस्वी झालेले होते. भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेवर रणजीतसिंह मोहिते पाटील यांना संधी देऊन लोकसभेच्या केलेल्या कार्याचे बक्षीस दिलेले होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने माढा लोकसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून अनेक रेंगाळलेली विकासकामे मार्गी लावलेली आहेत. तर काही कामे मार्गी लावून मतदार संघातील मतदार व जनतेला निवडणुकीत दिलेले शब्द पाळण्याकरता पाणीदार व कार्यतत्पर खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय श्रेयवाद किंवा अंतर्गत वाद यामुळे रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील परिवार यांच्यामधील राजकीय वितुष्ट सोशल मीडियावर व राजकीय कार्यक्रमामधून दिसून येत आहे. मोहिते पाटील परिवारातील सदस्य खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विरोधक असणारे नेते व कार्यकर्ते यांच्या संपर्कात येऊन जास्त जवळीकता वाढलेली आहे. विशेष म्हणजे फलटण तालुक्यातील रामराजे नाईक निंबाळकर व संजीवबाबा नाईक निंबाळकर यांच्या अनेक कार्यक्रमातून मोहिते पाटील यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या परिवारांना व मोहिते पाटील परिवार यांना पुढच्या निवडणुकीत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून तिकीट मिळू नये, याची रणनीती सुरू आहे. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीत असताना मोहिते पाटील परिवार यांच्या संपर्कात होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले असल्याने रामराजे नाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांची राजकीय खलबते सुरू झाली आहेत. तर, दुसरीकडे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रखडलेला निरा-देवधर कॅनॉलचा प्रश्न, इंग्रज कालीन प्रलंबित असलेला लोणंद-पंढरपूर-फलटण रेल्वेचा प्रश्न, कृष्णा भीमा स्त्रीकरणाला निरा प्लड डायवर्षण असे नाव बदलून योजना मार्गी लावण्याचे काम सुरू असून माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरससह फलटण, करमाळा, माढा, सांगोला, माण-खटाव या मतदारसंघातील सिंचनाच्या प्रकल्पाला गती देण्याचे काम सुरू आहे. रखडलेले प्रश्न सुटत असल्याने सर्वसामान्य जनता व मतदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामावर समाधानी आहे. तर राजकीय खच्चीकरण करण्याकरता रामराजे नाईक निंबाळकर व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विधान परिषदेमध्ये लक्षवेधी प्रश्न सुरू असताना रामराजे नाईक निंबाळकर व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील नेमके कोणत्या विषयावर गंभीर चर्चा करीत आहेत, याची चर्चा विधानभवनात रंगलेली असून विधानभवनातील कामकाज पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना चिंता पडलेली आहे. राजकीय विश्लेषकांमध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे. विधान परिषद सभागृहात लक्षवेधी सुरू असताना माढा लोकसभा मतदारसंघातील घडामोडींची चर्चा सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामगिरीवर भारतीय जनता पक्ष व वरिष्ठ नेतृत्व समाधानी आहेत. त्यामुळे पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा अश्वमेघ अडवण्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर व रणजीतसिंह मोहिते पाटील परिवार यशस्वी होतील का ? याकडे माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort