राष्ट्रवादी काँग्रेसचे महा अधिवेशन उत्साहात व जोशपूर्ण संपन्न झाले, तरुणाईची लक्षवेधी उपस्थिती…
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भाजपकडून गोची सुरू, अशा अडचणीच्या काळात युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांची उपस्थिती लक्षणीय ठरली
माळशिरस ( बारामती झटका )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महा अधिवेशन दिल्ली येथे देशाचे नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महा अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरण व जोशामध्ये संपन्न झाले, त्यामध्ये तरुणाईची उपस्थिती लक्षवेधी होती.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भारतीय जनता पक्षाकडून गोची करण्याचे काम सुरू आहे, अशा अडचणीच्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील व पदाधिकारी मित्र मंडळ यांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अनेक माजी मंत्री, खासदार, आमदार यांनी ऐन विधानसभेच्या व लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला होता. राष्ट्रवादी पक्ष अडचणीत आलेला होता, अशा कठीण परिस्थितीत पवार साहेब यांनी आजारपण व वयाचा विचार न करता पायाला भिंगरी बांधून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार दौरा, सभा घेऊन नवचैतन्य निर्माण केलेले होते. सातारा येथील जाहीर सभेत भर पावसात चिंब भिजून उपस्थित जनसमुदाय यांना संबोधित केले होते. याचे पडसाद महाराष्ट्रातील मतदारांनी मतदान करुन आमदार निवडून दिलेले होते.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेब यांची भूमिका महत्त्वाची होती. अडीच वर्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी जनतेच्या फायद्याची कामे करून घेतली. स्वार्थ साधून पक्षाचा फायदा करून घेतला.


राष्ट्रवादी पक्षातील पवार साहेब, अजितदादा पवार, जयंतराव पाटील, सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांचे पक्ष सत्तेत असताना व सत्तेत नसताना पक्षाचे काम निष्ठेने व जोमाने सुरू आहे. माळशिरस तालुक्याच्या गावांगावात व वाड्यावस्त्यांवर पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोचविण्याचे काम केलेले आहे. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा पक्ष वाढीसाठी भरीव काम सुरू आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत युवक काँग्रेसची फळी तयार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आलेख वाढता ठेवलेला आहे. बाबासाहेब माने पाटील यांनी महाअधिवेशनात उपस्थित राहून माळशिरस तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या समवेत मांडकीचे माजी सरपंच वस्ताद तानाजीराव रणवरे, गोरडवाडी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन खंडूतात्या कळसुले ( पवार), ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिसे, मेडद गावचे युवा नेते सचिन माने, पै. कालिदास रुपनवर आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

