राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांनी अनोखी मैत्री जपली.
बाबासाहेब माने पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यातून लहानपणीच्या जुन्या मैत्रीला दिला उजाळा…
गोरडवाडी ( बारामती झटका )
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष कण्हेर गावचे माजी उपसरपंच बाबासाहेब नामदेव माने पाटील यांनी गोरडवाडीचे विद्यमान सरपंच विजयराव निवृत्ती गोरड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. सदरच्या रक्तदान शिबिराचे प्रमुख अतिथी बाबासाहेब माने पाटील होते. यावेळी बाबासाहेब माने पाटील यांनी मित्रत्वाच्या नात्याने स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यातून लहानपणीच्या जुन्या मैत्रीला उजाळा देऊन अनोख्या पद्धतीने मैत्री जपलेली आहे.
गोरडवाडी गावचे विद्यमान सरपंच विजयराव निवृत्ती गोरड यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. १/१/२०२३ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरच्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. गोरडवाडी गावचे पहिले बिनविरोध सरपंच निवृत्ती गोरड उर्फ दादा व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन गोरडवाडीचे माजी सरपंच रामभाऊ गोरड यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आले. यावेळी युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड, ज्येष्ठ नेते भारत कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिसे यांच्यासह गावातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबासाहेब व विजयराव यांची लहानपणापासून अतूट मैत्री आहे. कायम लहानपणापासून त्यांनी मैत्री जपलेली आहे. सध्या विजयराव गोरडवाडीचे विद्यमान सरपंच आहेत तर बाबासाहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष आहेत. त्या दोघांनी मैत्रीमध्ये कधीही राजकारण आणलेले नाही. निखळ मैत्री कायम टिकून राहिलेली आहे. बाबासाहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे. समाजामध्ये रक्ताची गरज आहे, त्यासाठी रक्तदान ही चळवळ व्हावी. विजयराव आणि माझे संबंध लहानपणापासून आहेत, पाठीमागे होते, आजही आहेत आणि भविष्यामध्येही असेच आमचे संबंध दृढ राहतील. असे सांगून त्यांनी मैत्रीचे नाते जपत स्वतः रक्तदान करून मैत्रीचे अतूट नाते निर्माण करून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.info/ph/join?ref=53551167