राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या उपस्थितीत माळशिरस तालुक्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा युवा संवाद सोहळा संपन्न होणार…..
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे..
माळशिरस ( बारामती झटका )
देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार, विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता युवा संवाद सुरू केलेला आहे. माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना सुसंवाद साधण्याकरिता माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता युवा संवादाचे आयोजन शनिवार दि. 8/4/2023 रोजी सकाळी नऊ वाजता भगवंत मंगल कार्यालय, जाधववाडी रोड, सदाशिवनगर, ता. माळशिरस, येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी माळशिरस तालुका यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवकांचा संवाद साधून योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने युवा संवाद सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी युवकांशी संवाद साधून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांची खऱ्या अर्थाने गरज आहे. हीच गरज ओळखून महाराष्ट्रामध्ये युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांचा झंजावात सुरू आहे. माळशिरस तालुक्यात प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत असल्याने माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्याकरता तयारीला लागलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng