ताज्या बातम्याशैक्षणिक

राष्ट्रीय एकात्मता जपत फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या मुलांचा दिंडी पालखी सोहळा संपन्न.

संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून

लवंग (ता.माळशिरस) येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेषभुषेत तर उद्या बकरी ईद असल्यामुळे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी आपला पारंपारिक पेहराव परिधान करून एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा देत होते. यामुळे या शाळेतील मुलांनी समाजापुढे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.

उद्या आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन सण एकाच दिवशी येत असल्यामुळे या शाळेतील मुलांनी दिंडी पालखी सोहळा साजरा करत बकरी ईदच्या शुभेच्छा देत राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोख्याचा संदेश देत, या चिमुकल्या बाळगोपाळांनी आनंदात दोन्ही सण साजरे केले आहेत.

लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिक सौ. नूरजहाॅ फक्रुउद्दीन शेख या नेहमी शाळेत विविध सण, समारंभ, कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यामुळे मुलांना लहान वयातच सर्व सण समारंभ साजरा करण्यामागचा हेतू लक्षात येतो. या शाळेत मुलांना सर्व धर्म समभावची शिकवण ही दिली जाते.

या छोटे छोटे विद्यार्थ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ, मस्तकी टिळा, पांढरे धोतर, शर्ट परिधान करून तर, मुली साड्या नेसून, डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठलाचे नामस्मरण करीत हे छोटे वारकारी आपल्या संस्कृतीची जपणूक करीत होते. तर बकरी ईद या सणाला हे छोटे वारकरी मुस्लिम विद्यार्थ्यांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्या देत होते. या बालदिंडीत इस्लामी पोशाखातील विद्यार्थी वारकऱ्यांसमवेत चालत असताना अल्लाहकडे वारकऱ्यांसाठी प्रार्थना करीत होते. या सर्व वारकऱ्यांना दशरथ दगडे यांनी खाऊ वाटप केला. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या दिंडीतील वेगळेपण पाहून राष्ट्रीय एकात्मता हिच आहे. ‘हम सब एक है, चाहे वेशभूषा अलग है…’, असे उदगार उपस्थित नागरिकांकडून ऐकायला मिळत होते. या बाल दिंडीत पालक ही सहभागी झाले होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या संचालिका नूरजहाँ शेख, गुलशन शेख तसेच दशरथ दगडे, समाधान जगताप, भिमराव शिंदे, शाहीन कोरबू, अस्ल्म काझी, सौ.वैशाली उघडे यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort