राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मतदार नोंदणी दिव्यांग शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस येथे दि. २५ जानेवारी २०२३ ते २ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राष्ट्रीय मतदार सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहा दरम्यान दि. २७ जानेवारी २०२३ रोजी दिव्यांग मतदार नोंदणी करता विशेष शिबिराचे आयोजन अकलूज येथील तलाठी कार्यालयात करण्यात आले होते. या दिव्यांग मतदार नोंदणी शिबिराला दिव्यांग बांधवांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
यावेळी आर. बी. भंडारे निवडणूक नायब तहसीलदार माळशिरस, डी. एस. काळकुटे निवडणूक महसूल सहाय्यक माळशिरस, के. एच. शिंदे तलाठी अकलूज, शहाजीराव भिमराव माने देशमुख अध्यक्ष, विजयसिंह मोहिते पाटील सेवाभावी संस्था यशवंतनगर, गोरख मारुती जानकर अध्यक्ष, स्व. राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय दिव्यांग सेवाभावी संस्था तरंगफळ, राजू शिवाजी पवार, सौ. नूतन दत्तात्रय माने, पृथ्वीराज सुभाष तोरसे आदी उपस्थित होते.

या दिव्यांग शिबिरामध्ये १८ वर्षे पूर्ण असलेल्या नवीन तरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng