Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्या

रासायनिक खताची १० % मात्रा व खर्च बचत – नॅनो युरिया वापर काळाची गरज ! सतीश कचरे – प्र . तालुका कृषि अधिकारी

माळशिरस (बारामती झटका)

युरिया खताच्या वाढलेल्या किंमती, पुरवठा मधील अडथळा, तुठवडा, लिकिंग कृत्रीम भाववाढ, वाहतूक साठवन खर्च व त्याची कार्यक्षमता, उपयोगीत यांचे तुलना, विचार करता सर्वात सरस असलेल्या नत्रयुक्त खत नॅनो युरिया वापराशिवाय पर्याय नाही. नॅनो युरिया हे आधूनिक नत्रयुक्त खत आहे. जगात सर्वप्रथम नॅनो युरिया विकसित करण्याचा मान शासन अंगीकृत कंपनी इफकोकडे अबाधीत आहे. गुजरात मधील इफको जैवसंशोधन केंद्र येथे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेले नत्रयुक्त खत आहे. याचे परिक्षण ९४ पिकावर देशातील २० कृषि विद्यापीठ व संशोधन केंद्रात केले असून याचा वापर करून पारंपारिक युरिया वापर ५०% पर्यंत कमी करून चांगले अपेक्षित उत्पादन घेता येते, हा संशोधन निष्कर्ष काढला आहे.

नेनो युरिया वैशिष्ट्ये – नॅनो युरियात ४% नत्र म्हणजेच ४०,००० पी.पी.एम. सहतेचे नत्र असते. याला फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरने मान्यता दिली आहे. नॅनो युरिया अतिसुक्ष्म – ३० ते ५० नॅनोमीटर आकारमानात एकसंघ स्वरुपात उपलब्ध आहे. पारंपारिक युरियाशी तुलना करता नॅनोकणमुळे त्यांचे पृष्टभागीय क्षेत्र दहा हजार पट जास्त आहे. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता उपयोगीता ९०% असते व पारंपारीक युरीयाची ३०% ते ५०% पर्यंत वाढू शकते. नॅनो युरियातील नत्र सहज उपलब्ध स्वरूपात असते व ते विषारी नसलेमुळे जमिन, हवा, पाणी, वनस्पती व पर्यावरणाला सुरक्षित आहे.

नॅनो युरियाचे महत्व – उत्पादकतेत वाढ, वाहतूक साठवण व वापर खर्चात बचत, पर्यावरणाशी मैत्रीचे संबंध, बिनविषारी नत्र स्वरूप, शासकिय अनुदानाची खर्चाची बचत करणारे खत, सहज उपलब्धता, तुठवडा विरहीत, ग्लोबल वॉर्मिगला थांबविणारे, सर्व प्रकारची पीके वनस्पती उत्तेजके किटकनाशके बुरशीनाशके तणनाशके यांचे सुसंगत सर्व प्रकारच्या पिकास उपयुक्त, नत्रयुक्त खर्चाची ५०% बचत करणारे, उच्च कार्यक्षमता असलेले नत्र युक्त वैशीष्टपूर्ण नत्रयुक्त खत आहे.

वापरण्याचे प्रमाण – ५०० मिली नेनो युरिया १ बॅग पारंपारिक युरिया एवढी कार्यक्षमता उपयोगीता व नत्र पुरवठा करते. नॅनो युरिया उत्पादन तारखेपासून १ वर्षीपर्यत वापरावे. सावलीत थंड ठिकाणी साठवन केली असेल तर २ वर्षापर्यत वापरता येतो. नॅनो युरिया प्रामुख्याने फवारणी व ठिबकमधून देण्याची शिफारस आहे. २ ते ४ मिलि पीक वाढीची अवस्था व पीक नुसार नॅनो युरिया प्रति लिटर पाणी मिश्रणातून फवारणी केल्यास अतिसुक्ष्म कणामुळे युरिया पर्णरंध्रातून शोषण होऊन रसवाहिन्यातून वाहन होते. यामुळे यांची ९०% कार्यक्षमता व उपयोगीत दिसून येते. पहिली फवारणी २५ – ३० दिवसांनी व दुसरी फवारणी फुलधारणेच्या आगोदर केल्याने दृष्य परिणाम दिसून येतात. ठिबकद्वारे द्यावयाचे झालेस वरील प्रमाणे २% ते ४% द्रावण तयार करून अगोदर १५ मिनिटे ठिबक चालू करुण हे नॅनो युरिया द्रावण देण्यात येते व तदनंतर १५ मिनिटे ठिबक संच चालू ठेवून बंध केल्याने त्याची कार्यक्षमता व उपयोगीता वाढते. नॅनो युरिया शक्यतो फवारणी व ठिबकद्वारे सकाळी किंवा सायंकाळी द्यावा.

अर्थकारण – ५०० मिली २४० रु नॅनो युरीया = १ पोते २६४ ते ३२० युरिया एवढी कार्यक्षमता व नत्र पुरवठा करते. नॅनो युरियामुळे पारंपारिक युरियाच्या तुलनेत १०% बचत होते. वाहतूक साठवन खर्च, उपलब्धता, उपयोगीता, कार्यक्षमता याचा विचार करता नॅनो युरिया पारंपारिक युरिया पेक्षा सरस आहे. यामुळे खर्चाची बचत २० ते ३०% पर्यत होते. म्हणून उत्पादन खर्च बचत करणारा, उत्पादन वाढविणारा पर्यावरण, वनस्पती, प्राणी, मनुष्य, हवा यांचेशी मैत्रीचे संबंध ठेवणारा नत्रयुक्त खत नॅनो युरिया वापरणे काळाची गरज आहे व ते वापरण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी माळशिरस कार्यालयाने केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort