Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बिनविरोध निवड

राज्य सरकारमध्ये रिपाइंच्या एका कार्यकर्त्याला मंत्रिपद मिळवून देणार

मुंबई ( बारामती झटका )

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज झाली. त्यात देशभरातून रिपब्लिकन पक्षाचे ६०० प्रतिनिधी उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी केंद्रिय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आणि राष्ट्रीय सरचिटणीस पदी माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांची नियुक्ती करण्यात आली. ही निवड ३ वर्षांसाठी करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारीणीत एकूण २६ लोकांची निवड करण्यात आली आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यसरकारच्या नवीन मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद देण्याची मागणी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मला रिपब्लिकन कार्यकर्ते मंत्रीपदी निवड करण्याची मागणी करीत आहेत.

अनेकांनी इच्छा व्यक्त करत निवेदन दिले आहे.
त्यांच्यापैकी एका कार्यकर्त्याला राज्यात मला निश्चित मंत्रिपद मिळवून द्यावे लागेल. एका कार्यकर्त्यांची त्यासाठी मला निवड करावी लागेल. त्याबाबत लवकर मी निर्णय घेईन असे ना.रामदास आठवले म्हणाले.

राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरात काही प्रमाणात कपात केली आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मेट्रो कारशेड हे आरे येथे करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास आमचा पाठिंबा आहे. पर्यावरण आणि वनीकरणाला आमचा पाठिंबा आहे. जंगल वाढविता येईल. मुंबईच्या विकासासाठी मेट्रो सुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी आरेमध्ये नियोजित मेट्रोकारशेडला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे, असे ना.रामदास आठवले यांनी जाहीर केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button