ताज्या बातम्याशहर

रोटरी क्लब ऑफ अकलूजच्या अध्यक्षपदी रो. ओजस दोभाडा तर, सचिवपदी रो.कल्पेश पांढरे यांची निवड

माळीनगर (बारामती झटका)

अकलूज (ता.माळशिरस) सामाजिक सेवा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब अकलूजच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा ४२ वा पदग्रहण सभारंभ सोहळा अकलूज येथे शुक्रवारी सायंकाळी थाटात संपन्न झाला. अकलूज रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षपदी रो. ओजस दोभाडा तर नूतन सचिवपदी रो. कल्पेश पांढरे यांची निवड करण्यात आली.

रोटरी (३१३२) चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. स्वाती हेरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. अकलूज येथील रोटरी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पद्ग्रहण सोहळा प्रमुख पाहुणे प्रांतपाल (२०२५-२६) चे रो. सुधीर लातुरे व सह प्रांतपाल रो. अतुल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मावळते अध्यक्ष रो. ॲड. दिपक फडे यांनी नूतन अध्यक्ष रो. ओजस दोभाडा यांच्याकडे पदभार सोपविला व मावळते सचिव रो. केतन बोरावके यांनी नूतन सचिव म्हणून रो. कल्पेश पांढरे यांच्याकडे पदभार सोपविला.

मावळते सचिव रो. केतन बोरावके यांनी रोटरी क्लब अकलूजच्या मागील वर्षीच्या कार्याचा अहवाल सादर केला. यावेळी अकलुजचे सिनियर मेंबर्स रो. संदीप देसाई, रो. सुशील व्होरा, रो. मकरंद जमादार, रो. महावीर गांधी आसपासच्या रोटरी क्लबचे अध्यक्ष व सचिव तसेच नातेवाईक व मित्र परिवार आदी उपस्थित होते.

यावेळी रो. ओजस दोभाडा यांनी नूतन कार्यकारणी जाहीर केली. यामध्ये रो. गोमटेश दोशी, रो. शशील गांधी, रो. नितिन कुदळे, रो. बबनराव शेंडगे, रो. नवनाथ नागणे, रो. डॉ. बाहुबली दोशी, रो. गजानन जवंजाळ, रो. अमित सोनाज, रो. प्रवीण कारंडे, रो. अमेय व्होरा, रो. गौतम गांधी, रो. संदीप साळुंखे, रो. अजिंक्य जाधव, रो. अजित वीर, रो. हणमंत सुरवार, रो. कमलेश शहा, रो. मनिष गायकवाड, रो. सकल दोशी, रो. सचिन गुळवे, रो. स्वप्निल शहा, रो. स्वराज फडे, रो. योगेश व्होरा, रो. प्रिया नागणे, रो. तृप्ती कुदळे, रो. रुजल दोभाडा तर सदस्यपदी रो. संदीप लोणकर, रो. चेतन रासकर, रो. सावळजकर सर, रो. राजाराम गुजर, रो. राजीव बनकर, रो. दिग्विजय व्होरा यांची निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास उरवणे व राजाराम गुजर यांनी केले. तर शेवटी सचिव रो. कल्पेश पांढरे यांनी आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort