Uncategorizedताज्या बातम्या

लाचखोरी पकडणाऱ्या अधिकाऱ्यालाच लाच प्रकरणी अटक

कुंपणानेच खाल्ले शेत…

लातूर (बारामती झटका)

कुंपणच कसे शेत खाते याचे मोठे उदाहरण समोर आले असून लाचखोरी पकडणाऱ्या अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक करण्यात आली असून या महिला अधिकाऱ्याच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे‌.

लोकसेवकांत लाचखोरींचे प्रमाण वाढले असून लाच दिल्याशिवाय काम न करणारे काही अधिकारी, कर्मचारी तुरुंगात जाताना पाहायला मिळतात. यात मोठ्या साहेबांपासून शिपायांपर्यंत समावेश असतो. शासकीय कार्यालयात होणाऱ्या लाचखोरीवर नियंत्रण यावे, यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग हा एक स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. लाच घेणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची पडताळणी करून त्याला गजा आड करण्याचे काम हा विभाग करीत असते‌. लोक मोठ्या विश्वासाने लाचखोराच्या विरोधात तक्रार घेऊन या विभागाकडे जात असतात‌. पण याच विभागातील महिला अधिकारी याच प्रकरणात पकडली गेल्याने कुंपणच नेमके कशाप्रकारे शेत खाते हेच समोर आले आहे आणि या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे.

लाचखोरीला आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या अँटी करप्शनच्या महिला अधिकाऱ्यालाच लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली आहे. एका तक्रारी अर्जावर कारवाई न करण्यासाठी दोन मध्यस्थांच्या मार्फत लाचेची मागणी करणाऱ्या महिला पोलीस निरीक्षक मीना बकाल हिला एसीबीनेच पकडले आहे. तिच्यासह तिच्या पतीला देखील अटक करण्यात आली असून दोघांची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील खाजा मगदूम शेख यांचे बंधू शेख मेहराज हे कंधारच्या तहसील कार्यालयासमोर कागदपत्र तयार करून देण्याचा व्यवसाय करतात. या शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातून चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. यामुळे शेख हे काहीसे घाबरले होते. लाच लचपत प्रतिबंधक विभागाकडे कार्यरत असलेल्या मीना बकाल या महिला पोलीस निरीक्षकाने मध्यस्थ्यांच्या मार्फत एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. शेख यांच्या विरोधात आलेल्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.

कोणी शासकीय अधिकारी अथवा लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर ज्यांच्याकडे तक्रार करायची तेच लाच मागत असल्याचे पाहून शेख आश्चर्यचकित झाले. त्यांनी थेट संभाजीनगर येथील नाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी बकाल यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांनी ज्या मध्यस्थामार्फत लाचेची मागणी केली होती त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अँटी करप्शनच्या पथकाने पोलीस निरीक्षक मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर यांनाही अटक करण्यात आली आहे. बकाल या गेल्या वर्षभरापासून नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागात कार्यरत होत्या आणि 2012 साली त्या पोलीस सेवेत दाखल झाल्या होत्या.

लाचखोरीवर नियंत्रण आणण्याचे आणि लाचखोरांना गजाआड करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, तेच लाचखोरीत अडकल्याने आता विश्वास तरी कुणावर ठेवायचा, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असतानाच लाचखोरीत अटक होण्याची ही दुर्मिळ घटना असून या विभागावरील जनतेच्या विश्वासाला या घटनेने तडा गेला आहे. तथापि त्याच विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्याला तुरुंगात पाठवल्याने विश्वास वाढण्यास देखील मदत झाली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort