लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा वारसा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील सक्षमपणे जपत असल्याचा अनुभव आला…

सोलापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ पप्पासाहेब यांच्या विचाराचा व संस्काराचा वारसा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील सक्षमपणे जपत असल्याचा अनुभव सोलापूरकर यांना आलेला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली. त्यावेळी प्रदेश ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सुधीरजी लांडे, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव बाळगी, मल्लेशी बिडवे, धर्मराज पुजारी, जिल्हा सचिव मोहम्मद शेख, युवा नेते सुदर्शन अवताडे, सिद्धू खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील आणि बाळासाहेब शेळके यांचे राजकीय सलोख्याचे व मैत्रीचे संबंध होते. अनेकवेळा कार्यक्रमात भेटीगाठी होत असत, त्यावेळी चर्चा होत होती. पप्पासाहेब यांच्या आचारविचार व संस्काराची पद्धत सर्व सोलापूरकरांना माहित आहे. त्यांचाच वसा व वारसा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील सक्षमपणे चालवत असल्याचा प्रत्यय आलेला आहे. बाळासाहेब शेळके यांनी धवलदादांकडे पाहिल्यानंतर लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांची आठवण आलेली असणार आहे. बाळासाहेब शेळके यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्व काही सांगून जात आहेत. पप्पासाहेब आणि बाळासाहेब यांच्या मैत्रीचा धागा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी जपत नाते अधिक घट्ट व दृढ केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng