लोकनेते स्व. प्रतापसिंह (पप्पासाहेब) मोहिते पाटील यांची जयंती..
सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अभिषेकभैया कांबळे यांनी पप्पासाहेबांच्या आठवणीला उजाळा दिला.
सांगोला (बारामती झटका)
आदरणीय पप्पासाहेब आणि दादा यांच नातं वडील आणि मुलगा यापेक्षा अधिक मैत्रीच होतं. मला दादांसोबत अनेकदा लांबचा प्रवास करण्याची संधी मिळाली. असा एकही दिवस नाही की पप्पांच्या आठवणी दादांनी सांगितल्या नाहीत.
वडील आणि मुलाच मैत्रीपूर्ण नातं कस असावं हे, पप्पासाहेबांकडून शिकावं. दादा कॉलेजला असताना साहेबांनी शिकारीसाठी दिलेली रिव्हॉल्वरचे किस्से, स्व. दिगंबर बागल यांच्या मंत्री पदासाठी पप्पासाहेबांनी मा. शरद पावरांशी घेतलेला पांग आणि दादांवर दिलेली जबाबदारी असो, बालपणीचे कौटुंबिक किस्से असे एक न अनेक नातं, मैत्री सांभाळणारे किस्से दादांकडून ऐकून मनं भरून यायचं.
प्रचंड धाडस, सहवासातील प्रत्येक माणसांना मोठं करण्याची धडपड आणि आपल्या माणसांसाठी लढण्याची वृत्ती हे फक्त पप्पासाहेबच करू शकतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा जास्त आमदार हे पप्पासाहेबांचे कार्यकर्ते आहेत. शब्द हेच प्रमाण मानून पप्पासाहेबांनी आयुष्यभर काम केले. आयुष्याला भावनिकतेची किनार असली की नाती, माणसं आपोआप जपली जातात, हे ते नेहमी सांगायचे.
दादांना बोलताना ‘बेटा’ असा उल्लेख करायचे. ‘बेटा मी तुझ्यासाठी कमवलेली सगळ्यात मोठ्ठी संपत्ती ही माणसं आहेत, त्यांना जप’ हे पप्पासाहेबांचे शेवटचे शब्द दादा आजही भावनिक होऊन सांगतात. आजही ‘प्रतापगड’ वर गेल्यानंतर त्यांच्या आठवणी गडाच्या पानांफुलांत, मातीत, घोड्याच्या टापात, आणि प्रतापगडावर आलेल्या प्रत्येक माणसाच्या नजरेत साठवलेल्या दिसतात. गरीब, बहुजनांना आपलंस करून मैत्रीचा, मायेचा आणि विश्वासाचा हात खांद्यावर टाकणारा नेता व बाप पुन्हा होणे नाही…

मला अनेकदा लोक विचारतात की, तुमच जरा जास्तच प्रेम जडलंय मोहिते पाटलांवर… त्यानं कसं सांगू, मुंबईला जाण्यासाठी जेंव्हा मी गडावर जायचो तेंव्हा पहाटे 5 वाजता स्वतः मा. पद्मजादेवी (आईसाहेब) आम्हाला चहा घेऊन यायच्या. जाताना सावकाश जावा बाळांनो… वाटेत काही तरी खावा… आणि रात्री 1-2 वा. आल्यानंतर, तुम्ही जेवलात का?… नक्की का?.. येवढं आपल्याच मुलांसारखं प्रेम करणारी जर आई असेल आणि… एका बाजूला पाटीलकी आणि अहंकाराणे माजलेली माणसं असताना.. जात, धर्म आणि श्रीमंती यापेक्षा माणसं आणि मैत्री श्रेष्ठ मानून खांद्यावर हात टाकून गरिबांच्या लेकरांना मांडीला मांडी लावून जेवायला बसवणारा मा. धवल दादांसारखा नेता आहे, म्हणून आम्हाला हे कुटुंब आपलं वाटतं.
हे संस्कार आदरणीय कै. पप्पासाहेबांचे आहेत. यामुळे पापासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, सर्वसामान्य माणसांच राज्य आणण्यासाठी आम्ही नेहमीच मा. दादांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहणार आणि काँग्रेस जोमाने उभी करून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणार. काँग्रेसचं राज्य आणणे हिच खरी कै. पाप्पासाहेबांना श्रद्धांजली ठरेल.
अश्या या मैत्रीच्या दुनियेतील राजाला.. महानेता.. लोकनेत्याला जयंती निमित्त विन्रम अभिवादन…
आज सर्वात प्रिय वडिलांची जयंती असतानाही मा. धवलसिंहदादा सांगली येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, यापेक्षा अधिक पक्षनिष्ठा आणि कर्तव्याप्रती प्रेम काय असावं.. एकहनवा आदर्शच…
आपला
मा. अभिषेक (भैया) कांबळे (8600281010)
अध्यक्ष, सांगोला तालुका काँग्रेस.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng