Uncategorized

लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यातून उतराई होण्याची संधी मिळाली आहे…

पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या तीन दिवसाच्या झंजावाती दौऱ्याने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील वातावरण ढवळून निघाले

नातेपुते (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या विचाराचा वारसा खऱ्या अर्थाने जोपासणारे व अखेरच्या श्वासापर्यंत जीवात जीवमान असेपर्यंत जनतेची सेवा करू या ब्रीद वाक्याने प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या सकारात्मक व लोक उपयोगी कार्यातून ऋणमुक्त व उतराई होण्याची संधी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलमध्ये पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यासह पॅनलमधील सर्व सदस्यांच्या चिठ्ठी समोर शिक्का मारण्याची संधी मिळालेली असल्याचे मतदारांमधून बोलले जात आहे. माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीच्या पद्मजादेवी मोहिते पाटील, अजित बोरकर, पांडुरंग वाघमोडे, पांडुरंग पिसे, भीमराव फुले, सोनाली पाटील या उमेदवारांसह नेते व कार्यकर्त्यांच्या प्रचाराचा झंजावाती दौरा झालेला असल्याने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील वातावरण ढवळून निघालेले आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती फत्तेसिंह माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर, भाजपचे के. के. पाटील, स्वाभिमानीचे अजित बोरकर यांनी समविचारी पॅनलच्या माध्यमातून तगडे आव्हान उभा केलेले आहे.

पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी उमेदवार नेते व कार्यकर्ते यांच्या समवेत तीन दिवसांमध्ये रविवार दि. २३ चाकोरे, तिरवंडी, उंबरे दहिगाव, मेडद, मारकडवाडी, कदमवाडी, फोंडशिरस, पळसमंडळ, बांगर्डे, पिरळे, कुरबावी, एकशिव, शिंदेवाडी, देशमुख वाडी, धर्मपुरी, गुरसाळे, दहिगाव, नातेपुते, तामसीदवाडी, सदाशिवनगर, पुरंदावडे, सोमवार दि. २४ माळशिरस, गोरडवाडी, जळभावी, मांडकी, रेडे, भांब, कण्हेर, इस्लामपूर, गिरवी, लोंढे मोहितेवाडी, लोणंद, मोरोची, पिंपरी, कोथळे, कारूंडे, मांडवे, जाधववाडी, भांबुर्डी, मंगळवार दि. २५ खुडूस, डोंबाळवाडी, झंजेवाडी, मोटेवाडी, तरंगफळ, पठाणवस्ती, चांदापुरी, निमगाव, झिंजेवस्ती, कुसमोड काळमवाडी, पिलीव/झुलेवाडी, बचेरी, शिंगोर्णी, कोळेगाव, फळवणी, तांदूळवाडी, मळोली अशा गावांचा सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत झंजावाती दौरा करून मतदारांशी सुसंवाद साधलेला आहे. लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सहकार राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना माळशिरस तालुक्याच्या विशेष करून पश्चिम भागात अनेक विकास कामे व व्यक्तिगत कामे केलेली आहेत. आजपर्यंत प्रतापगडाच्या प्रतीनिधीला मतदान करण्याची संधी मिळालेली नाही. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान करण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे. निश्चितपणे पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्यासह सर्वच उमेदवारांना अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केलेला असल्याची चर्चा माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, व्यापारी यांच्यामधून होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button