लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांचा सन्मानपूर्वक राष्ट्रध्वजवंदना कार्यक्रम संपन्न.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते तहसीलदार तुषार देशमुख व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक 01 मे 2023 रोजी सकाळी 08.00 वाजता तहसील कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण समारंभ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते तहसील कार्यालयाचे प्रांगणात राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रम सन्मानपूर्वक व उत्साही वातावरणात संपन्न झाला.

सदरचा कार्यक्रम माळशिरस तहसील कार्यालयाचे तहसीलदार तुषार देशमुख यांच्या नियंत्रणात होणार आहे. यावेळी अप्पर तहसीलदार अजिंक्य गोडगे महसूल नायब तहसीलदार आशिष सानप निवडणूक नायब तहसीलदार राजाभाऊ भंडारे, माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, नीरा उजवा कालवा उप अभियंता श्री मस्कर साहेब, माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र टाकणे साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे साहेब, गट शिक्षणाधिकारी देशमुख साहेब, जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता आर.एस. रणवरे, जिल्हा परिषद पाणीपुरवठा उप अभियंता श्री बाबर साहेब, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय श्रीमती प्रिया पाटील मॅडम सामाजिक वनीकरण अधिकारी श्रीमती ससाने मॅडम प्रशासनातील अधिकारी व भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक कैलास वामन, यांच्यासह माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव व विविध कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद राष्ट्रीय पोशाख परिधान करून समारंभास उपस्थित होते.


लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सन्मानपूर्वक शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर माळशिरस पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत पानिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांनी वाद्यासह मंजुळ आवाजात उपस्थितांची मने जिंकून अभिमानाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणत असताना सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या होत्या.



राष्ट्रध्वज वंदना कार्यक्रमानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी व उपस्थित मान्यवर यांची संयुक्त बैठक झाली विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली चहापानानंतर कार्यक्रम संपला सदरच्या कार्यक्रमाचे छायाचित्रण व तुरेबाज फेटा बांधण्याचे काम उल्का डिजिटल माळशिरस श्री रविराज वाणी यांनी केलेले होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng