लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते ‘द क्लासिक मोबाईल’ शॉपीचा उद्घाटन समारंभ…..
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माळशिरस शहरात द क्लासिक मोबाईल दुकानाचा उद्घाटन समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार…
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते बुधवार दि. २२/०३/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता, शिंगाडे बिल्डिंग, अहिल्यादेवी चौक, म्हसवड रोड, ता. माळशिरस येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन दुकानाचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होणार आहे.
श्री. सोपान वसंत गारूळे, रा. भांबुर्डी यांचे बंधू चिरंजीव आनंद वसंत गारूळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोबाईलमधील ज्ञान आत्मसात करून स्वतःचा व्यवसाय साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्तावर ‘द क्लासिक मोबाईल’ या नूतन दुकानाचा उद्घाटन समारंभ लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. तरी माळशिरस शहर व पंचक्रोशीतील सर्व मित्र परिवार, नातेवाईक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त गारूळे परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng