Uncategorizedताज्या बातम्या

लोकप्रिय दमदार आ. राम सातपुते यांची माळशिरस विधानसभ मतदार संघातील सर्वच गावात विकासाची दमदार कामगिरी – भैय्यासाहेब चांगण.

काविळ झालेल्या लोकांना डोळ्याने जग पिवळे दिसते, विकास व कामे पाहायला दृष्टी लागते, नातेपुते शहराध्यक्ष भैय्यासाहेब चांगण यांचा टोला

नातेपुते ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी राज्यामध्ये भाजपची सत्ता नसतानासुद्धा माळशिरस विधानसभा मतदारसंघात सर्वच गावात विकासाची दमदार कामगिरी केलेली आहे. मात्र, तालुक्यातील कावीळ झालेल्या लोकांना डोळ्यांनी जग पिवळेच दिसते, विकास व कामे पाहायला दृष्टी लागते, असा टोला नातेपुते शहराध्यक्ष भैय्यासाहेब चांगण यांनी लगावलेला आहे.

नातेपुतेकरांना अनेक दिवसांपासून वंचित घटकातील लोकांच्या विकासासाठी निधीची आवश्यकता होती. अनेक दिवस पाठपुरावा करून सरकार विरोधात असल्यामुळे निधी उपलब्ध झाला नाही. सरकार बदलल्यानंतर साडेचार कोटी रुपये नातेपुते नगरपंचायतीसाठी मंजूर झाल्यानंतर तालुक्यातील असंतुष्ट लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला आहे.
लोकप्रिय आमदारावर टीका टिपणी करीत असताना सत्तेत असताना नातेपुतेकरांच्या अडचणी दिसत नव्हत्या का ? आपल्या डोळ्यामध्ये वडसे वाढलेले होते.

नेत्यांचा एवढा पुळका आहे, तर निधी मंजूर करून का घेतला नाही, असा सवाल उपस्थित करून ज्या प्रमाणे कावळे काव काव करून कोकिळेचा आवाज थांबवू शकतात मात्र, आवाज घेऊ शकत नाही. तसेच लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यावर कावकाव करणाऱ्यांनी आमदारांच्या विकासकामाचे दृष्टीहिन लोक मोजमाप करू शकणार नाही, असा सणसणीत टोला लगावलेला आहे.

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात विकासाची गंगा येणार आहे. सत्तेत नसताना आमदार यांनी निधी खेचून आणलेला आहे. आत्ता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे सरकार आहे. नातेपुते येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची विधानसभेच्या वेळी पहिली सभा झालेली होती.

त्यावेळेस नातेपुतेसह माळशिरस तालुक्याचा विकास करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सभेत दिलेले होते. त्याप्रमाणे सरकार सत्तेत आल्यावर नातेपुतेकरांचा प्रश्न सोडविला असल्याने ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’ या म्हणीचा प्रत्यय नातेपुतेकरांना आलेला आहे.

माळशिरस तालुक्यात आजपर्यंत एकही गाव वंचित राहिलेले नाही. यापुढे भाजपचे सरकार असल्याने माळशिरस विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात व वाड्यावर विकासाची गंगा येणार आहे. त्यावेळी टीकाकारांनी विकासाची गंगा पाहण्याकरिता कावीळवर उपाय करावा, असा सबुरीचा सल्ला भारतीय जनता पक्षाचे नातेपुते शहराध्यक्ष भैयासाहेब चांगण यांनी टीकाकारांना दिलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button