वाघोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनचा तडकाफडकी राजीनामा…..
वाघोली (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात पूर्व भागात नावारूपाला आलेल्या वाघोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक चंद्रकांत चव्हाण यांनी आज झालेल्या संस्थेच्या मासिक सभेत आपल्या चेअरमन पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. या राजीनामा सत्रामुळे संस्थेच्या सभासदांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाघोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीची माननीय संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक वर्षभरापूर्वी बिनविरोध झाली होती. चेअरमन अशोक चंद्रकांत चव्हाण यांनी जवळजवळ एक वर्ष संस्थेच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळली. त्यांच्या कार्यकालात संस्थेने जवळजवळ साडेतीन कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले होते. तसेच मार्च 2023 मध्ये संस्था पातळीवर व बँक पातळीवर 100% कर्जाची वसुली केली होती. तसेच संस्थेचा अमृत महोत्सव वर्षही साजरे केले होते. तसेच संस्थेच्या इमारतीचे नूतनीकरण करून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा वाघोलीचे स्थलांतर त्यांच्याच कार्यकाळात झाले.
सदरचे कामकाज करत असताना महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री. विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन श्री. धैर्यशील मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन श्री. जयसिंह मोहिते पाटील, माजी चेअरमन विष्णू वासुदेव मिसाळ, माजी पंचायत समितीचे सदस्य सूर्यकांत शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज करून संस्था जिल्हा पातळीवर नावारूपाला आणली. तसेच सन 2021-22 मध्ये सभासदांना 12% प्रमाणे लाभांश वाटला होता. चेअरमन अशोक चव्हाण यांनी अचानक दिलेल्या राजीनामामुळे संस्थेच्या संचालक मंडळामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng