विज्ञान महाविद्यालयामध्ये ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन
सांगोला (बारामती झटका)
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, विज्ञान महाविद्यालय, सांगोला येथे रविवार दि. 14 मे 2023 रोजी सकाळी 10:00 वा. ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे व त्यांच्या समस्या सोडवणे. ह्या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांकडून त्यांचे मनोगत ऐकून घेऊन प्रवेशित विद्यार्थ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सदर माजी विद्यार्थी मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून विलास कोळेकर, जिल्हा निबंधक वर्ग – १ व अध्यक्ष म्हणून दादासाहेब अनुसे उद्योगपती राज उदयोग समूह हे उपस्थित राहणार आहेत.
तरी माजी विद्यार्थ्यांनी सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी केले आहे.
हा मेळावा यशस्वी व्हावा यासाठी माजी विद्यार्थी समितीचे चेअरमन डॉ. नारायण आदलिंगे, माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव श्री. श्रीनिवास येलपले (सर), माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद पवार, माजी विद्यार्थी समितीचे सदस्य प्रा. किसन पवार, डॉ. दिलीप कसबे, डॉ. जगन्नाथ ठोंबरे, प्रा. बाळासाहेब सरगर, प्रा. जावेद शेख, प्रा. दिपक शिंदे हे विशेष परिश्रम घेत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng