ताज्या बातम्यासामाजिक

विठ्ठलवाडी विकास सोसायटीचे माजी संचालक ज्ञानदेव गुंड यांचे निधन

माढा (बारामती झटका)

माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी संचालक ज्ञानदेव भानुदास गुंड यांचे शनिवारी दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री उशिरा उपचारादरम्यान अल्पशा आजाराने बार्शी येथे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या अकाली निधनाने समस्त गुंड परिवार व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रविवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी विठ्ठलवाडी येथील स्मशानभूमीत विविध क्षेत्रातील मान्यवर व नातेवाईकांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ७ वाजता विठ्ठलवाडी येथे तिसऱ्या दिवशीच्या विधी होणार असल्याचे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी मच्छिंद्र गुंड यांनी सांगितले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, तीन बहिणी, दोन मुले, सून व नातवंडे असा परिवार आहे. ते बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी येथील सेवानिवृत्त प्रा. छगन गुंड व वाशी येथे कार्यरत इंग्रजी विषयाचे प्रा. कुंडलिक गुंड यांचे वडील, विठ्ठलवाडीचे प्रगतशील शेतकरी मगन गुंड, सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, माजी ग्रामपंचायत सदस्य भिमराव गुंड यांचे जेष्ठ बंधू, विठ्ठल गुंड सर, पत्रकार राजेंद्र गुंड सर, नारायण गुंड सर, प्राथमिक शिक्षक गणेश गुंड, विठ्ठलराव शिंदे प्राथमिक पतसंस्थेचे संचालक सुधीर गुंड, प्राथमिक शिक्षक दिनेश गुंड यांचे चुलते, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी रमेश शेंडगे व तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे यांचे सासरे आणि सेवानिवृत्त पोलिस पाटील संदिपान शेंडगे व सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी जगन्नाथ शेंडगे यांचे मेव्हणे होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. What an engaging and informative article! The author did a great job. I’m curious about others’ thoughts on this topic. Click on my nickname for more engaging reads.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort