विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार लवकरच माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येणार…
विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांची राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी सदिच्छा भेट घेतली…
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांची मुंबई येथे निवासस्थानी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त संचालक व राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी सदिच्छा भेट घेऊन अजितदादांचा सन्मान केला. यावेळी शिवप्रसाद उद्योग समूहाचे उद्योजक व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरदबापू मोरे, फ्लोरा उद्योग समूहाचे मोहितशेठ जाधव, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यशवंतराव उर्फ दादाराजे घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये चंचू प्रवेश करून राष्ट्रवादीची गुढी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभारली असल्याबद्दल अजितदादा पवार यांनी उत्तमराव जानकर यांचे अभिनंदन करून लवकरच माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले आहे.
माळशिरस तालुक्यात अजितदादा यांच्या आगमनाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढणार असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अजितदादांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार असून कार्यकर्त्यांमध्ये जोश व उत्साह निर्माण होणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्षांचे मनोबल वाढलेले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळेमुळे ग्रामीण भागामध्ये रुजलेली आहेत. राष्ट्रवादीतील तरुण तडफदार व सडेतोड बोलणारे अजितदादा पवार यांची महाराष्ट्रामध्ये वेगळी क्रेझ आहे. माळशिरस तालुक्यात अजितदादा पवार यांच्या आगमनाने भविष्यात राजकीय घडामोडी व समीकरणे बदलण्यासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र देतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना असल्यामुळे अजितदादांच्या माळशिरस तालुक्याच्या दौऱ्याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. निवडणूक प्रचारामध्ये अजितदादा पवार येऊन गेलेले होते मात्र, निवडणुकीपूर्वी अजितदादा माळशिरस तालुक्यात येत असल्याने मोहिते पाटील गटामध्ये चलबिचल सुरू झालेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Kailee Garcia gimenez