Uncategorized

वेळापुर येथील कुमारी नंदिनी सर्वगोड हिची रायफल शूटिंग नेमबाजीत दैदीप्यमान व उल्लेखनीय कामगिरी.

कुमारी नंदिनीचा “रायफल” शूटिंगमध्ये “नेम” मात्र, हॉटेलवर उपजीविका करणारे आई वडील आर्थिक परिस्थितीमुळे “रायफल” घेतील की नाही ? याचा “नेम” नाही….

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर, ता. माळशिरस येथील इंग्लिश स्कूल वेळापूर या शाळेमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत असलेली कुमारी नंदिनी सचिन सर्वगोड ही विद्यार्थिनी रायफल शूटिंग नेमबाजी स्पर्धेत दैदीप्यमान व उल्लेखनीय कामगिरी करत आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे नंदिनी हिला उत्कृष्ट रायफल व ट्रॅकसूट नाही. तरीसुद्धा नंदिनी हिची रायफल शूटिंग नेमबाजीत उत्तरोत्तर प्रगती आहे. कुमारी नंदिनीचा रायफल शूटिंगमध्ये नेम आहे, मात्र हॉटेल व्यवसायावर उपजीविका करणारे आई-वडील यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे “रायफल” घेतील की ? नाही याचा “नेम” नाही, अशी परिस्थिती नंदिनीच्या नशिबी आलेली आहे.

वेळापूर येथील सौ. उर्मिला व श्री. सचिन लक्ष्मण सर्वगोड यांना नंदिनी, आश्लेषा, स्नेहल अशा तीन मुली व अथर्व एक मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी वडील लक्ष्मण सर्वगोड यांचे दुःखद निधन झालेले आहे. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सचिन हॉटेल व्यवसायातून पत्नी व आईच्या सहकार्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मुलांचा शालेय खर्च पोटाला चिमटा घेऊन भागवण्याचे काम सुरू आहे.

नंदिनी ही चुणचणीत व हुशार मुलगी आहे. इंग्लिश स्कूलच्या शेजारीच अक्षय राऊत सर यांचा सुवर्ण संकल्प शूटिंग क्लब आहे. या ठिकाणावरून नंदिनी दररोज घरी येत जात असताना इतर मुलांप्रमाणे आपणसुद्धा या क्लबमध्ये भाग घ्यावा, अशी मनामध्ये इच्छा आल्यानंतर क्लबचे कोच अक्षय राऊत सर यांनी नंदिनीच्या अंगातील कलागुण ओळखून नंदिनी रायफल शूटिंग नेमबाजीत उल्लेखनीय कार्य करू शकते, हा उदात्त हेतू ठेवून वेळोवेळी अक्षय राऊत सर यांनी नंदिनीला मदत केलेली आहे. उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे नंदिनीचा रायफल शूटिंग नेमबाजीत उल्लेखनीय कार्यातून आलेख चढता गेलेला आहे. सोलापूर जिल्हास्तरीय रायफल शूटिंग नेमबाजी स्पर्धा पिलीव येथे डिसेंबर 2023 मध्ये पार पडलेल्या होत्या. त्यामध्ये नंदिनीने पहिला नंबर पटकावला होता. त्यानंतर अहमदनगर विभागांमध्ये सुद्धा दैदिप्यमान कामगिरी केलेली होती. जानेवारी 2023 सोलापूर जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला होता. 2023 मध्ये डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग नेमबाजीत दुसरा नंबर मिळवलेला होता. घरची आर्थिक परिस्थिती नसताना आई-वडील हॉटेल व्यवसायावर उपजीविका करीत असल्याने इतर मुलांप्रमाणे रायफल किंवा ट्रॅक सूट नंदिनीच्या नशिबी नाही. मात्र, रायफल शूटिंग नेमबाजीतील बक्षीस मात्र नंदिनीच्या नशिबी आहेत.
नंदिनी सर्वगोड हिला रायफल शूटिंग नेमबाजी स्पर्धेमध्ये भविष्यात वेळापूर गाव, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र राज्य व भारत देशाचे नाव उज्वल करण्याचा मानस आहे. यासाठी आर्थिक परिस्थिती आडवी येत आहे. तरी समाजामधील दानशूर व्यक्तींनी कुमारी नंदिनी सर्वगोड हिला आर्थिक मदत केल्यास निश्चितपणे नंदिनी सर्वगोड हिला रायफल शूटिंग नेमबाजीत उल्लेखनीय कार्य करण्यास मदत होईल. यासाठी दानशूर लोकांनी सचिन लक्ष्मण सर्वगोड बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक 1305010011689 IFC code BARBOVELAPU या बँक अकाउंटवर किंवा 99 21 77 45 74 या फोन पे वर किंवा वेळापूर माळशिरस रोडवर धुमाळी शेजारी श्री महालक्ष्मी खानावळ या ठिकाणी संपर्क साधून समाजामधील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करून नंदिनीच्या रायफल शूटिंग नेमबाजीत नंदनवन करावे, अशी आपणांस बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनल यांच्या वतीने नम्र विनंती आहे. दानशूर व्यक्तींना विनंती आहे आपण मदत केल्यास आमच्याशी संपर्क साधावा. समाजासमोर आपण केलेल्या चांगल्या कार्याची समाजासमोर मांडण्याची संधी द्यावी. आपण आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू रुपात मदत केल्यानंतर आपली मदत कोणाला कळू नये अशी आपली धारणा असते. परंतु, आपण केलेल्या सहकार्यामुळे दुसऱ्याला प्रेरणा मिळेल हा उदात्त हेतू आहे. तरी दानशूर व्यक्तींनी नंदिनीला सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort