वेळापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्तांतर होणार का ?
दादा बाबा गटाची सोसायटीच्या निवडणुकीत ट्रेलर था, ग्रामपंचायत निवडणुकीचा पिक्चर अभी बाकी है...
वेळापूर ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्याच्या राजकीय प्रतिष्ठा असणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी एक वेळापूर ग्रामपंचायत आहे. वेळापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधी गटाकडून मोहिते पाटील गटाकडे सत्तांतर होणार का ? असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जात आहे. वेळापूर ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष मोहिते पाटील गटाची सत्ता होती. गेल्या दशकामध्ये अंतर्गत राजकीय मंडळींमुळे ग्रामपंचायतीची सत्ता विरोधी गटाकडे गेलेली होती. वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये दादा बाबा गट एकत्र आणण्यामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व भाजपचे संघटन महामंत्री शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी दोन्ही गटाचा मेळ करून वेळापूर विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक जिंकून आणून सोसायटीच्या निवडणुकीचा ट्रेलर दाखवला, अभी ग्रामपंचायत निवडणुकीचा पिक्चर बाकी है.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती लोकनेते स्व. सूर्यकांत माने देशमुख दादा व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीशराव माने देशमुख उर्फ बाबा असे मोहिते पाटील समर्थक असणारे दादा बाबा यांचे दोन गट अस्तित्वात आहेत. दोन्ही गटातील एकमेकांच्या प्रतिष्ठेच्या लढाईत विरोधी गटाला छुपे पाठबळ मिळत असल्याने गेल्या दशकापासून मोहिते पाटील गटाकडून विरोधी गटाकडे ग्रामपंचायतची सत्ता गेली होती. माने देशमुख, मोहिते पाटील, माने पाटील यांचे मूळ गाव वेळापूर समजले जाते. त्यामुळे तिन्ही परिवारामध्ये लग्न सोहळ्याच्या वेळी श्री अर्धनारी नटेश्वर मंदिरामध्ये पहिल्यांदा पोशाख केला जातो. कारण वेळापूरमध्ये कोणाच्याही लग्न समारंभावेळी महादेवाला पोशाख केला जातो, ही आजपर्यंतची परंपरा आहे.
वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत विरोधी गटाने समोरासमोर पॅनल उभा केलेले होते. त्यावेळेस दादा बाबा गट एकत्र येऊन निवडणूक जयसिंह मोहिते पाटील व धैर्यशील माहिती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढले होते. त्यावेळेस विरोधी गटासोबत मोहिते पाटील गटातील नेते व कार्यकर्ते सामील झालेले होते. तरीसुद्धा दादा बाबा गटात मनोमिलन झाले असल्याने निवडणुकीत विरोधी गटाचा सुपडा साप केलेला होता. त्याच धर्तीवर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत दादा बाबा गट एकत्र येऊन निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्तांतर होणार का ? असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जात आहे. कारण मोहिते पाटील गटातील छुपे विरोधक उघड उघड विरोधी गटात सामील झालेले असल्याने त्यांची वजाबाकी करूनसुद्धा दादा बाबा गटाची एकजुटीने मोट बांधल्यानंतर सत्तांतर होईल, असा विश्वास सर्वसामान्य जनता व मतदार यांना वाटत आहे.
थेट जनतेतील सरपंच पद असल्याने उमेदवार कोण असणार, यावरही निवडणूक अवलंबून राहणार आहे. सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने सर्वसमावेशक सरपंच पदाचा उमेदवार देण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे. निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास दोन दिवसात सुरुवात होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://accounts.binance.com/ph/register?ref=RQUR4BEO
A, relative apoptosis as determined by ELISA see Materials and Methods dapoxetine priligy uk