वेळापूर तंटामुक्त समिती अध्यक्षपदी युवराज मंडले तर उपाध्यक्षपदी सौ. अश्विनी भानवसे
वेळापूर (बारामती झटका) शिवाजी मंडले यांजकडून
वेळापूर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित महिला ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले, तर ध्वजाची पूजा व ध्वजारोहण सरपंच रजनिश बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच तानाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य संजय आबा मंडले, नानासो मुंगुस्कर, हनुमंत वायदंडे, दीपक राऊत, अमृतराज माने देशमुख, रवीराज गायकवाड, शिवाजी पनासे, सौ. नयन माने, सौ. विमल जाधव, सौ. छाया साठे, कु. सिमरण मुलाणी, सौ. अंजना माने उपस्थित होते.
जि. प. शाळा यांच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली होती. यानंतर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेच्या अध्यक्षपदी सरपंच रजनीश बनसोडे होते, तर सचिव म्हणून धनाजी धांडोरे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच यावेळी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची नविन कार्यकारणी निवडण्यात आली. यामध्ये तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी युवराज मंडले यांची, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ. अश्विनी उमेश भानवसे सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच तानाजी चव्हाण, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच माजी जि. प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, जीवन जानकर बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य काकासाहेब जाधव, रिपाई माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, माजी सैनिक भिमराव इंगोवले, अशोक बनसोडे माजी उपसरपंच, जावेद मुलाणी, महेंद्र साठे, दत्तात्रय चंदनशिवे, विजयभाऊ बनसोडे, आप्पाराव कांबळे, काशिनाथ आडत, निवृत्ती भुसारे, सुखदेव आडत, शंकर आडत, नागेश क्षीरसागर, जवान माने-देशमुख, सुनिल साठे, शिवाजी मंडले, प्रदीप सरवदे, अजीत साठे, रणजीत सरवदे, शरद साबळे, संजय पनासे, राहुल सराटे, श्याम मंडले, दादा मंडले, दत्ता येडगे, दीपक चव्हाण, स्वप्निल सरवदे आदींसह जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, वेळापूर तलाठी व विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारीवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng